Kolhapur: माेदींच्या हॅटट्रिकसाठी मतभेद गाडून एकत्र, काेल्हापुरात महायुतीचा जंगी मेळावा
By समीर देशपांडे | Updated: January 14, 2024 20:48 IST2024-01-14T20:48:18+5:302024-01-14T20:48:53+5:30
Kolhapur: जगभरामध्ये भारताची मान ताठ करणाऱ्या, शत्रूराष्ट्रांच्या भागात घुसून ‘अरे ला कारे’ म्हणण्याचे धाडस दाखवणाऱ्या, हजारो कोटी रूपये एका ‘क्लिक’वर सामान्यांच्या खात्यात जमा करणाऱ्या आणि ५०० वर्षांपूर्वींचे श्री रामांचे भव्य मंदिर उभारणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार महायुतीचेच करण्याचा निर्धार नेत्यांनी रविवारी व्यक्त केला.

Kolhapur: माेदींच्या हॅटट्रिकसाठी मतभेद गाडून एकत्र, काेल्हापुरात महायुतीचा जंगी मेळावा
- समीर देशपांडे
कोल्हापूर - जगभरामध्ये भारताची मान ताठ करणाऱ्या, शत्रूराष्ट्रांच्या भागात घुसून ‘अरे ला कारे’ म्हणण्याचे धाडस दाखवणाऱ्या, हजारो कोटी रूपये एका ‘क्लिक’वर सामान्यांच्या खात्यात जमा करणाऱ्या आणि ५०० वर्षांपूर्वींचे श्री रामांचे भव्य मंदिर उभारणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार महायुतीचेच करण्याचा निर्धार नेत्यांनी रविवारी व्यक्त केला.
येथील महासैनिक दरबारमध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये हा निर्धार व्यक्त करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासह विविध घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीने लोकसभा निवडणुकीच एकप्रकारे रणशिंगच फुंकले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या भाषणातून लोकसभेच्या दोन्ही जागा महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.