शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : थकीत एफआरपीप्रकरणी ‘महाकाली’, ‘माणगंगा’ची मंगळवारी साखर आयुक्तांसमोर सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 17:49 IST

कोल्हापूर विभागातील बारा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे विहीत वेळेत पैसे दिलेले नाहीत. त्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा लागू केल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली’, ‘केन अ‍ॅग्रो’ या कारखान्यांची मंगळवारी आयुक्तांसमोर सुनावणी असल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापूर विभागातील बारा कारखान्यांनी दिले नाहीत एफआरपीप्रमाणे वेळेत पैसे साखर आयुक्तांनी लागू केल्या आहेत नोटिसा सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली’, ‘केन अ‍ॅग्रो’ कारखान्यांची सुनावणी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील बारा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे विहीत वेळेत पैसे दिलेले नाहीत. त्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा लागू केल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली’, ‘केन अ‍ॅग्रो’ या कारखान्यांची मंगळवारी आयुक्तांसमोर सुनावणी असल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.केंद्र सरकारच्या कायद्यानुसार शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आल्यापासून चौदा दिवसांत एफआरपीप्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहेत. कोल्हापूर विभागातील साखर कारखाने साधारणत: ५ ते १० नोव्हेंबर या कालावधीत सुरू झाले.

कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे दिले की नाही याबाबत माहिती दर पंधरवड्याला साखर आयुक्त कार्यालयाकडून मागवली जाते. नोव्हेंबर २०१७ अखेर विभागातील नऊ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे दिलेले नव्हते.

साखर आयुक्त कार्यालयाने त्यांना नोटिसा काढून त्यांची सुनावणी २ जानेवारीला घेण्यात आली. साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत शेतकऱ्यांची एफआरपी, कर्मचारी देणी यासह इतर देणी याबाबत माहिती घेण्यात आली.

संबंधित कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. ३१ डिसेंबरअखेर ज्यांनी एफआरपीप्रमाणे पैसे दिलेले नाहीत, त्यांना साखर आयुक्तांनी आज बोलाविले आहे.

यांची झाली सुनावणी :उदयसिंह गायकवाड (अथणी शुगर्स), इंदिरा (अथणी शुगर्स), इको केन (चंदगड), केन अ‍ॅग्रो, महाकाली, निनाईदेवी, राजाराम बापू पाटील युनिट १, २ व ३.

यांची होणार सुनावणी :केन अ‍ॅग्रो, महाकाली, माणगंगा. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरSangliसांगलीSatara areaसातारा परिसर