शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

कोल्हापूर : ‘फुटबॉल’साठी एक परिपूर्ण मैदान तयार करू देवू  : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 1:34 PM

कोल्हापूरच्या फुटबॉलला शास्त्रोक्त दिशा देण्यासाठी शहरातील कुठल्याही पाच मैदानांपैकी एक मैदान केवळ फुटबॉल खेळासाठी अद्यायवत करु देवू , असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. हॉटेल सयाजी येथे शुक्रवारी (१९) रात्री ‘फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी’या व्यावसाईक फुटबॉल संघाच्या बोधचिन्ह अनावरण प्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्दे‘फुटबॉल’साठी एक परिपूर्ण मैदान तयार करू देवू  : चंद्रकांत पाटीलफुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी बोधचिन्ह अनावरण

कोल्हापूर : कोल्हापूरच्याफुटबॉलला शास्त्रोक्त दिशा देण्यासाठी शहरातील कुठल्याही पाच मैदानांपैकी एक मैदान केवळ फुटबॉल खेळासाठी अद्यायवत करु देवू , असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. हॉटेल सयाजी येथे शुक्रवारी (१९) रात्री ‘फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी’या व्यावसाईक फुटबॉल संघाच्या बोधचिन्ह अनावरण प्रसंगी ते बोलत होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या क्रीडा धोरणांमुळे कोल्हापूरही खेळाबाबत देशाच्या नकाशावर येवू लागले आहे. येत्या आॅलंपिक स्पर्धात कोल्हापूरचे १२ जण पदक आणतील. एखादी स्पर्धा आयोजित करणे आणि व्यावसाईक संघ निर्माण करणे फरक आहे. त्यात आयलीग सारखा संघ करणे कठीण बाब आहे.

त्यात कोल्हापूरच्या फुटबॉलला नवी दिशा मिळावी म्हणून उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी स्तुत्य काम केले आहे. यासाठी लागणारे मैदान महत्वाचे आहे. त्यामुळे कोल्हापूरातील पाच मैदाने आहेत. त्यातील एक फुटबॉलसाठी परिपूर्ण अद्यावत मैदान डिसेंबर अखेर करुन देवू. यासाठी राज्य शासनाचा निधी व उद्योजकांचा सीएसआर निधीही देवू.विफाचे उपाध्यक्ष व के.एस.ए.अध्यक्ष मालोजीराजे म्हणाले, ’फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी ’ च्या रुपाने कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वात सोनेरी पान लिहण्यासारखा दिवस आहे. फुटबॉल मध्ये गुणात्मक वाढ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.प्रास्ताविकात चंद्रकांत जाधव म्हणाले, लहानपणापासूनच शिक्षण आणि खेळ याकरीता क्रीडा विद्यापीठ बनवण्याचा मानस व्यक्त केला. १३ व १५ वर्षाखालील आयलीग स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला आहे. रविवारी एफसी कोल्हापूर सिटीच्या महिला संघाचा कुपरेजवर पहिला सामना आहे. त्यामुळे बोधचिन्हाचे अनावरण केले. आभार उपाध्यक्ष नगरसेवक संभाजी जाधव यांनी मानले.यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, योगेश कुलकर्णी, अरुण नरके, संजय शेटे, राजू पाटील, उमेश चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील