शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

कोल्हापूर : ‘खंडोबा’ची ‘संध्यामठ’वर दणदणीत मात, के.एस.ए.वरिष्ठ गट फुटबॉल लीग ; पाटाकडील (ब)नेही प्रॅक्टिस (ब)ला ३-० ने केले पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 7:28 PM

के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धेत बुधवारी शाहू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ फुटबॉल संघाने संध्यामठ तरुण मंडळाचा ५-३ ने ; तर पाटाकडील (ब) ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (ब) चा ३-० असा पराभव केला.

ठळक मुद्दे‘खंडोबा’ची ‘संध्यामठ’वर दणदणीत मातशाहू स्टेडियमवर के.एस.ए.वरिष्ठ गट फुटबॉल लीग पाटाकडील (ब)नेही प्रॅक्टिस (ब)ला ३-० ने केले पराभूत

कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ फुटबॉल संघाने संध्यामठ तरुण मंडळाचा ५-३ ने ; तर पाटाकडील (ब) ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (ब) चा ३-० असा पराभव केला.शाहू स्टेडियमवर खंडोबा व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यांत प्रारंभापासून ‘खंडोबा’चेच वर्चस्व राहिले. त्यांच्या अर्जुन शेतगांवकर, अजिज मोमीन, कपिल शिंदे, रणवीर जाधव, सुधीर कोटिकेला यांनी वेगवान चाली रचल्या तर ‘संध्यामठ’कडून अजिंक्य गुजर, सौरभ हारूगले, मोहित मंडलिक, सतीश अहिर यांनी तितक्याच वेगवान चाली रचत दबा झुगारून दिला.

कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत बुधवारी खंडोबा तालीम मंडळ व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण. (छाया : नसीर अत्तार)

१३ व्या मिनिटाला ‘संध्यामठ’कडून सौरभ हारूगलेने गोल नोंदवत सामन्यांत संघास आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर १७ व्या मिनिटाला ‘खंडोबा’कडून अजिज मोमीनने गोल नोंदवत सामना १-१ अशी बरोबरी साधली.

त्यानंतर २३ व्या मिनिटाला अर्जुन शेतगांवकरने गोल नोंदवत सामन्यात ‘खंडोबा’स

कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत बुधवारी खंडोबा तालीम मंडळ व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण. (छाया : नसीर अत्तार)

२-१ आघाडी मिळवून दिली. ३८ व्या मिनिटास पुन्हा अर्जुन शेतगांवकरने संघाचा तिसरा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत ३-१ अशी संघास भक्कम स्थिती निर्माण करून दिली.उत्तरार्धात ४८ व्या मिनिटास ‘खंडोबा’कडून सुधीर कोटिकेलाच्या पासवर अजिज मोमीनने गोल करत सामन्यात ४-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ५८ व्या मिनिटाला ‘संध्यामठ’कडून सतीश अहिरने गोल करत ४-२ अशी आघाडी कमी केली.

६६ व्या मिनिटाला ‘खंडोबा’कडून कपिल शिंदेच्या पासवर अर्जुन शेतगांवकरने संघाचा पाचवा व वैयक्तिक तिसरा गोल नोंदविला. या गोलनंतर आघाडी कमी करण्यासाठी ‘संध्यामठ’कडून प्रयत्न झाले.

७७ व्या मिनिटास या प्रयत्नांना यश आले. त्यांच्याकडून आशिष पाटीलने गोल करत ५-३ अशी आघाडी कमी केली. अखेरीस हीच गोलसंख्या कायम राखत सामना खंडोबा तालीम मंडळ फुटबॉल संघाने जिंकला.

पाटाकडील तालीम मंडळ (ब)ने प्रॅक्टिस क्लब (ब) यांच्यात झालेल्या सामन्यात प्रारंभापासून पाटाकडील(ब)चेच वर्चस्व राहिले. रोहन कांबळे, पवन सरनाईक, शुभम चव्हाण, आकाश काटे, प्रथमेश हेरेकर यांनी वेगवान चाली रचल्या. ३७ व्या मिनिटास पाटाकडील(ब) च्या रोहित पोवारने गोल करत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली.

उत्तरार्धात प्रॅक्टिसकडून शुभम मठकर, जॉन्सन, रोहित भोसले, श्लोक साठम, किरणकुमार चव्हाण यांनी सामन्यात बरोबरी साधण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. ६७ व्या मिनिटास पुन्हा पाटाकडील (ब)कडून शुभम चव्हाणने गोल करत ही आघाडी २-० अशी भक्कम केली.

‘पाटाकडील’कडून ७४ व्या मिनिटास प्रथमेश हेरेकरने संघाचा तिसरा गोल नोंदविला. अखेरपर्यंत सामन्यात प्रॅक्टिस (ब)ला आघाडी कमी करता आली नाही. त्यामुळे हा सामना पाटाकडील (ब) ने जिंकला.

शाहू स्टेडियमवर गुरुवारचा सामनादु. ४ वा. बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल