कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानकातून अडीच लाखांचे दागिने लंपास

By सचिन भोसले | Updated: May 20, 2023 16:54 IST2023-05-20T16:54:19+5:302023-05-20T16:54:33+5:30

बस पकडत असताना महिलेची अडीच लाखांचे दागिने असणारी पर्स चोरट्याने लंपास केली.

Kolhapur Jewels worth two and a half lakhs looted from central bus station | कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानकातून अडीच लाखांचे दागिने लंपास

कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानकातून अडीच लाखांचे दागिने लंपास

कोल्हापूर :  मध्यवर्ती बस स्थानकात एस.टी.बस पकडत असताना महिलेची अडीच लाखांचे दागिने असणारी पर्स चोरट्याने लंपास केली. गुरुवारी (ता.१८) सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला. संतोष सावळेराम गायकवाड (वय ४५ रा. कल्याण ठाणे,मुळ चितळीस्टेशन,अहमदनगर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संतोष गायकवाड हेआपल्या कुटुंबियांसह गुरूवारी (दि.१८ ) नमध्यवर्ती बस स्थानकात आले होते. एस.टी.बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिलेची पर्स लंपास केली. यात सोन्याचे  पाच तोळ्यांचे गंठण,एक तोळ्याचे झुबे,सोन्याचे वेल,असे आठ तोळे सोन्याचे दागिने,रोख रक्कम,पॅनकार्ड,आधारकार्ड,ड्रायव्हिंग लायसेन्स असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. अंमलदार संकपाळ पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Kolhapur Jewels worth two and a half lakhs looted from central bus station