कोल्हापूर : शेअर बाजारामधील गुंतवणूक श्रद्धा व सबुरीने केल्यास फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 12:21 IST2018-06-08T12:21:13+5:302018-06-08T12:21:13+5:30
शेअर बाजाराची परिस्थिती ही गुंतवणुकीस योग्य असेल. केलेली गुंतवणूक श्रद्धा, सबुरी, संयम व अभ्यासपूर्ण केल्यास जास्त नफा देणारी, अशी फायदेशीर गुंतवणूक असेल, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व गुंतवणूक विश्लेषक डॉ. वसंतराव पटवर्धन यांनी केले.

कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशन आणि सिक्युरिटीज् अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलताना डॉ. वसंतराव पटवर्धन. डावीकडून नितीन ओसवाल, अजित गुंदेशा, विपीन दावडा, राजीव शहा.
कोल्हापूर : शेअर बाजाराची परिस्थिती ही गुंतवणुकीस योग्य असेल. केलेली गुंतवणूक श्रद्धा, सबुरी, संयम व अभ्यासपूर्ण केल्यास जास्त नफा देणारी, अशी फायदेशीर गुंतवणूक असेल, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व गुंतवणूक विश्लेषक डॉ. वसंतराव पटवर्धन यांनी केले.
कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशन आणि सिक्युरिटीज् अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलत होते.
पटवर्धन म्हणाले, गुंतवणूक हा अभ्यासाचा विषय आहे; पण या अभ्यासात धनलाभ होतोच तरीसुद्धा शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर आहे. योग्यवेळी गुंतविणे व योग्यवेळी नफा घेऊन बाहेर पडणे हे महत्त्वाचे असते. क्रिकेटप्रमाणे येथेही टायमिंग साधायला हवे.
शेअर बाजारावर जागतिक स्तरावर राजकीय आर्थिक व नैसर्गिक घटनांचा परिणाम होत असतो तसेच पाऊस पडला तरी व अति पडला तरी शेअर बाजारावर परिणाम होतो. पाच हजार कंपन्यांचे शेअर जरी बाजारात असले तरी गुंतवणूक फक्त १५ ते २० कंपन्यांत हवी. कंपन्यांचे त्रैमासिक प्रसिद्ध होणारे अहवाल महत्त्वाचे असतात.
असोसिएशनचे सेक्रेटरी राजीव शहा यांनी सूत्रसंचालन केले तर प्रेसिडेंट अजित गुंदेशा यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय असोसिएशनचे जॉर्इंट सेक्रेटरी विपीन दावडा यांनी केले. व्हाईस प्रेसिडेंट नितीन ओसवाल यांनी आभार मानले. याप्रसंगी जॉर्इंट ट्रेझरर प्रवीण ओसवाल, संचालक मनिष झंवर, अशोक पोतनीस, रवींद्र सबनीस व गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.