कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय महिलादिनी गुरुवारी महिला मतदार नोंदणी, अभिनेत्री अक्षया देवधर यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 10:55 IST2018-03-03T10:55:39+5:302018-03-03T10:55:39+5:30

‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त गुरुवारी (दि. ८) कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे महिला मतदारांची नोंदणी व मतदार जनजागृतीसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी येथे दिली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ‘तुझ्यात जीव रंगला’फेम अभिनेत्री अक्षया देवधर यांची राहणार आहे.

Kolhapur: International Women's Day women voter registration, presence of actress Akshaya Devadhar on Thursday | कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय महिलादिनी गुरुवारी महिला मतदार नोंदणी, अभिनेत्री अक्षया देवधर यांची उपस्थिती

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय महिलादिनी गुरुवारी महिला मतदार नोंदणी, अभिनेत्री अक्षया देवधर यांची उपस्थिती

ठळक मुद्देमहिला मतदारांची नोंदणी व मतदार जनजागृतीसाठी व्याख्यानजिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली माहिती ‘तुझ्यात जीव रंगला’फेम अभिनेत्री अक्षया देवधर उपस्थित राहणार

कोल्हापूर : ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त गुरुवारी (दि. ८) कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे महिला मतदारांची नोंदणी व मतदार जनजागृतीसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी येथे दिली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ‘तुझ्यात जीव रंगला’फेम अभिनेत्री अक्षया देवधर यांची राहणार आहे.


गुरुवारी (दि. ८) दुपारी तीन वाजता शाहू स्मारक भवन येथे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महिलांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत व महिला मतदारांची नोंदणी व मतदार जनजागृतीसाठी व्याख्यान अशा विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ‘तुझ्यात जीव रंगला’फेम अभिनेत्री अक्षया देवधर यांची राहणार आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांकरिता महिलांची व्याख्याने व महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून तयार केलेल्या म्युझिकल योगा, काव्यवाचन, गाणी, गझलवाचन व गझलगायन अशा बहुविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.

 

Web Title: Kolhapur: International Women's Day women voter registration, presence of actress Akshaya Devadhar on Thursday