कोल्हापूर : गुडघे तपासणी शिबिरात ११७ रुग्णांची तपासणी, भगवान महावीर सेवा धाम ट्रस्टचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 18:20 IST2018-03-30T18:20:45+5:302018-03-30T18:20:45+5:30
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त भगवान महावीर सेवाधाम ट्रस्टच्या दहाव्या वर्षपूर्तीनिमित्त घेण्यात आलेल्या हाडांची ठिसूळता आणि गुडघे तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ११७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात मशीनद्वारे रुग्णांच्या हाडांची ठिसूळता तपासण्यात आली. या रुग्णांना यावेळी मोफत औषधेही देण्यात आली.

कोल्हापूर येथील भगवान महावीर सेवाधाम ट्रस्टमार्फत घेण्यात आलेल्या शिबिरात डॉ. उमेश जैन यांनी रुग्णांच्या गुडघ्यांची तपासणी केली.
कोल्हापूर : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त भगवान महावीर सेवाधाम ट्रस्टच्या दहाव्या वर्षपूर्तीनिमित्त घेण्यात आलेल्या हाडांची ठिसूळता आणि गुडघे तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात ११७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात मशीनद्वारे रुग्णांच्या हाडांची ठिसूळता तपासण्यात आली. या रुग्णांना यावेळी मोफत औषधेही देण्यात आली.
कोल्हापूर येथील भगवान महावीर सेवाधाम ट्रस्टमार्फत घेण्यात आलेल्या शिबिरात डॉ. उमेश जैन यांनी रुग्णांच्या गुडघ्यांची तपासणी केली.
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. उमेश जैन म्हणाले, शरीरातील कॅल्शियमची कमतरता तसेच वयोमानानुसार होणारी हाडांची झीज तसेच अनियमित आणि पौष्टिक आहार न घेतल्याने हाडांचे आजार वाढले आहेत. सर्वांनी नियमित आहारात दूध, केळी अशा कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
भगवान महावीर यांच्या प्रतिमेपुढे दीपप्रज्वलन करून या शिबिरास प्रारंभ करण्यात आला. श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, श्री वासुपूज्य जैन श्वेतांबर मंदिराचे अध्यक्ष लीलाचंद ओसवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बाबूलाल ओसवाल, रतन गुंदेशा, श्रेणिक ओसवाल, जयेश ओसवाल, ईश्वर परमार, दिलीप रायगांधी, राजेश निंबाजिया, हरीश निंबाजिया तसेच ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिरात २७ जणांवर होणार उपचार
या शिबिरात २७ जणांना गुडघेदुखीचा त्रास असल्याचे निदान झाले. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. उमेश जैन यांनी या रुग्णांच्या पुढील उपचारासाठीचा अहवाल मागविला आहे. भगवान महावीर सेवाधाम ट्रस्टमार्फत या रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.