शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

कोल्हापूर : दिल्लीतील शिवजयंतीमध्ये पाच राज्यांतील शिवभक्तांचा सहभाग, संभाजीराजे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 3:30 PM

दिल्ली येथे १९ फे ब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यास महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या पाच राज्यांतील शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. हजारो कलाकारांसह हत्ती आणि घोड्यांचा समावेश असलेली शिवछत्रपतींची मिरवणूक दिल्लीत लक्षवेधी ठरेल, असा विश्वास त्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देसंभाजीराजे यांची माहिती हजारो कलाकारांसह हत्ती, घोड्यांचा सहभाग

कोल्हापूर : दिल्ली येथे १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यास महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या पाच राज्यांतील शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. हजारो कलाकारांसह हत्ती आणि घोड्यांचा समावेश असलेली शिवछत्रपतींची मिरवणूक दिल्लीत लक्षवेधी ठरेल, असा विश्वास त्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.संभाजीराजे म्हणाले, शिवराज्याभिषेक समितीच्या माध्यमातून एकीकडे राज्याभिषेक हा लोकोत्सव करण्यामध्ये आम्हांला यश आले. मात्र आता शिवजयंती ही ‘राष्ट्रोत्सव’ व्हावा, या भूमिकेतून मी गेल्या वर्षी ‘शिवनेरी’वरच पुढील वर्षी दिल्ली शिवजयंती उत्सव घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार सर्व पातळ्यांवर नियोजन सुरू आहे.शोभायात्रेत पुण्याचे ३०० कलाकारांचे स्वराज्य ढोलपथक, ६० कलाकारांचे ध्वजपथक, १२ कलाकारांचे तुतारी पथक, २०० जणांची वारकरी दिंडी, ७० कलाकारांचे लेझीम पथक, १२ जणांचे हलगी पथक, २० जणांचे शाहिरी पथक, ८० कलाकारांचे मर्दानी खेळ, २५ जणांचे मल्लखांब पथक, ५० जणांचे धनगरी ढोलपथक तसेच पूर्वोत्तर राज्यांतील लोककलाकार त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत.

शाहीर आझाद नायकवडी प्रथमच शिवाजी महाराजांचा हिंदीतून पोवाडा यावेळी सादर करणार आहेत. पत्रकार परिषदेला शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे फत्तेसिंह सावंत, विनायक फाळके, स्वप्निल यादव, अमर पाटील, हेमंत साळोखे, राम यादव, मकरंद ऐतवडे, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते उपस्थित होते.

असा असेल कार्यक्रम

१९ फेब्रुवारी

  1. सकाळी ९ वाजता- संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन.
  2. सकाळी १०.१० वाजता- नवीन महाराष्ट्र सदन येथे शिवजन्मोत्सव सोहळा व शाहिरी कार्यक्रम(मराठमोळ्या वेशामध्ये ५०० महिलांचा सहभाग)
  3. सकाळी ११.००- महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, राजपथ ते इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रापर्यंत शोभायात्रा
  4. दुपारी १ वाजता- शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची छायाचित्रे व ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन, माहितीपटाचे सादरीकरण, रक्तदान शिबिर, प्रमोद मांडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन.
  5. सायंकाळी ६ वाजता- मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन.
  6. सायंकाळी ७ वाजता- शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर आधारित ‘शिवगर्जना’ महानाट्याचा प्रयोग.

२० फेब्रुवारी

  1. सायंकाळी ७ वाजता ‘शिवगर्जना’ प्रयोगाचे पुन्हा सादरीकरण. 

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूरDelhi Gateदिल्ली गेट