कोल्हापूर : केएमटीमध्ये महिलेची पर्स लांबविली; ८७ हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 16:37 IST2018-08-23T16:36:42+5:302018-08-23T16:37:34+5:30
केएमटी बसमधून प्रवास करत असताना बापट कॅम्प येथील महिला प्रवाशाची तीन अज्ञात महिलांनी पर्स चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. २२)दुपारी घडली. पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र, बोरमाळ, दोनशे रुपये असा सुमारे ८७ हजार २१० रुपयांचा माल चोरून नेला.

कोल्हापूर : केएमटीमध्ये महिलेची पर्स लांबविली; ८७ हजारांची चोरी
कोल्हापूर : केएमटी बसमधून प्रवास करत असताना बापट कॅम्प येथील महिला प्रवाशाची तीन अज्ञात महिलांनी पर्स चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. २२)दुपारी घडली. पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र, बोरमाळ, दोनशे रुपये असा सुमारे ८७ हजार २१० रुपयांचा माल चोरून नेला.
याबाबतची फिर्याद प्रभावती प्रकाश यमगर्णीकर (वय ५०, रा. कुंभार वसाहत, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.
पोलिसांनी सांगितले की, प्रभावती यमगर्णीकर या दुपारी कागल ते बोंद्रेनगर या केएमटी बसमधून मार्केट यार्ड ते कावळानाका या दरम्यान प्रवास करत होत्या.
त्यावेळी त्यांची पर्स चोरीस गेली. त्यांनी तीन अनोळखी संशयित महिलांवर संशय व्यक्त केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.