मी नाराज नाही, शिवसेनेचाच; आमदार प्रकाश आबिटकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 13:20 IST2022-06-21T13:19:05+5:302022-06-21T13:20:05+5:30
विधान परिषदेचे मतदान झाल्यानंतर, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासह दहा आमदारांना जरा भेटायचे आहे, असे म्हणून फार्म हाऊसवर नेले होते. तेव्हापासून आमदार अबिटकर यांचा संपर्क होत नव्हता.

मी नाराज नाही, शिवसेनेचाच; आमदार प्रकाश आबिटकर
कोल्हापूर- मी नाराज नाही आणि मुंबईला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे, अशी माहिती राधानगरीचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. आम्ही सर्व जण आता मुंबईला रवाना होत आहोत, असे आमदार आबिटकर यांचे लहान बंधू प्रा. अर्जुन आबिटकर यांनी स्पष्ट केले आहे.
विधान परिषदेचे मतदान झाल्यानंतर, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासह दहा आमदारांना जरा भेटायचे आहे, असे म्हणून फार्म हाऊसवर नेले होते. तेव्हापासून आमदार अबिटकर यांचा संपर्क होत नव्हता. गुजरात सीमेवर गेल्यावर अबिटकर याना वेगळे काहीतरी घडत असल्याचे लक्षात आले. पहाटे त्यांनी अन्य कुणाच्या तरी फोनवरून बंधू प्रा. अर्जुन अबिटकर यांच्याशी संपर्क साधला. आपले मित्र व शिवसेना आमदार वैभव नाईक यांनाही घडलेले सर्व सांगा आणि आम्ही मुंबईला येत असल्याचा निरोप दिला आहे. त्यानुसार आमदार आबिटकर व त्यांचे समर्थक मुंबईकडे रवाना झाले असल्याचे प्रा. आबिटकर यांनी सांगितले..