कोल्हापुरात उन्हाचा चटका तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:44+5:302021-04-05T04:21:44+5:30
कोल्हापूर : दोन दिवसांच्या काहीशा दिलाशानंतर रविवारपासून पुन्हा एकदा सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. दुपारी तापमानाचा पारा ...

कोल्हापुरात उन्हाचा चटका तीव्र
कोल्हापूर : दोन दिवसांच्या काहीशा दिलाशानंतर रविवारपासून पुन्हा एकदा सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. दुपारी तापमानाचा पारा ३९ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने अंगाची लाही लाही होत होती. उन्हाचा चटका तीव्र असल्याने दुपारी बाहेर पडणे मुश्कील झाले होते.
कोल्हापुरात गेल्या आठवडाभरापासून उष्णतेची लाट आल्यासारखी परिस्थिती आहे. तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला होता. मग मागील दोन दिवसांपासून दोन अंशांनी पारा घसरला होता. रात्रीचे किमान तापमानही २० अंशांपर्यंत खाली आल्याने पहाटे काहीशी थंडी जाणवत होती. रविवारी मात्र पारा पुन्हा वर चढू लागला. दुपारी १२ ते ४ या वेळेत तीव्रता जास्त होती. ३९ अंशांच्या पुुढे तापमान गेल्याने अंगाची लाहीलाही होत होती. हा पारा असाच वाढत जाणार असून हा आठवडा उष्णतेची लाट घेऊन येणारा असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. साधारणपणे मंगळवारपासून तापमान पुन्हा एकदा ४० च्या वर जाणार असून, साधारणपणे ते या आठवड्याच्या अखेरीला ४२ अंशांपर्यंतही जाईल, असा अंदाज वर्तवल्याने उन्हापासून वाचण्याची तयारी आताच करावी लागणार आहे.
चौकट०१
उन्हाचा पारा चढू लागल्याने भाजीपाल्याच्या आवकेवरही परिणाम जाणवू लागला आहे. भाजीपाल्याची बाजारात आवक कमी झाल्याने दर चढू लागले आहेत.
फोटो : ०४०४२०२१-कोल-तापमान
फोटो ओळ : कोल्हापुरात वाढलेल्या उन्हाच्या चटक्याने दुपारी बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. दसरा चौकात रविवारी दुपारी उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी दुचाकीस्वाराने चक्क हातात छत्री घेऊनच वाहन चालविले.
(छाया : आदित्य वेल्हाळ)