शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: तरण्याला लागेना जोर, शेतकऱ्यांना पडला घोर; धरणक्षेत्रातही पाऊस कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 13:22 IST

कोल्हापूर : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. ऐन पुर्नवस्यर्क (तरणा) नक्षत्रात आकाश पांढरे शुभ्र झाल्याने शेतकऱ्यांची ...

कोल्हापूर : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. ऐन पुर्नवस्यर्क (तरणा) नक्षत्रात आकाश पांढरे शुभ्र झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाला असून नद्यांची पाणीपातळी एकदम कमी झाली आहे.यंदा, माॅन्सून उशिरा सुरू झाला आणि आठ-दहा दिवस पाऊस राहिला. माॅन्सूनच्या चार महिन्यांत पुनर्वस्यर्क (तरणा पाऊस) व पुष्येर्क (म्हातारा पाऊस) ही दोन नक्षत्र काळात जोरदार पाऊस कोसळतो. तरणा पाऊस ६ जुलै रोजी सुरू झाला आहे, वाहन गाढव असून हे नक्षत्र सुरू झाल्यापासून पाऊस कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून खडखडीत ऊन पडत आहे. त्यामुळे आणखी चिंता वाढली आहे. अद्याप जमिनीत पाणी झालेले नाही. त्यामुळे भात व नागलीच्या रोपलागणी खोळंबल्या आहेत.तरणा पाऊस आणखी आठ दिवस राहिला आहे. २० जुलैला सूर्य पुष्येर्क नक्षत्रात प्रवेश करत आहे. वाहन बेडूक असून या कालावधीत जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे.दरम्यान, बुधवारी पावसाने उसंत घेतल्याने पंचगंगेची पातळी १४.४ फुटांपर्यंत खाली आली आहे. रुई, इचलकरंजी हे दोन बंधारे पाण्याखाली आहेत.किडीला पोषक वातावरणसध्या पाऊस कमी झाला असून ढगाळ व ऊन असे वातावरण राहिले आहे. हे किडीला पोषक असून भुईमूग, सोयाबीन, भात व वेलवर्गीय पिकांना याचा फटका बसू शकतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरी