कोल्हापूर : ‘गोकुळ’ ची पावडर दुबईला, चार कंटेनर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 11:41 IST2018-10-09T11:40:17+5:302018-10-09T11:41:44+5:30
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) दूध पावडर दुबईला निर्यात करण्यात आली. देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर चांगले असल्याने संघाने दूध पावडर दुबईला निर्यात करण्याचा निर्णय घेतला. पावडरचे चार कंटेनर दुबईला रवाना करण्यात आले.

‘गोकुळ’ ने दूध पावडर दुबईला निर्यात केली. यावेळी पहिल्या कंटेनरचे पूजन अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर. सी. शहा, राजेश काळे, एस. एम. पाटील, आदी उपस्थित होते.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) दूध पावडर दुबईला निर्यात करण्यात आली. देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर चांगले असल्याने संघाने दूध पावडर दुबईला निर्यात करण्याचा निर्णय घेतला. पावडरचे चार कंटेनर दुबईला रवाना करण्यात आले.
गेले सहा- सात महिने दूध पावडरच्या दरात घसरण झाल्याने दूध संघ अडचणीत आले होते. कोट्यवधी रुपयांची पावडर गोडावूनमध्ये पडून राहिली आहे. ‘गोकुळ’कडेही मोठ्या प्रमाणात पावडर पडून राहिली होती, त्यात देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पावडरचे दर चांगले असल्याने संघाने निर्यातीचा निर्णय घेतला.
पहिल्या टप्प्यात ‘गोकुळ’ने १00 टन पावडर दुबईला निर्यात केली. यापुढे पावडर निर्यात सुरू राहणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.
पहिल्या कंटेनरचे पूजन अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, महाव्यवस्थापक आर. सी. शहा, राजेश काळे, बोर्ड सचिव एस. एम. पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक धैर्यशील घोरपडे, अनिल चौधरी, सचिन पाटील, आदी उपस्थित होते.