कोल्हापूर : शेतजमिनीच्या वादातून तरुणास मारहाण, तिघांवर गुन्हा : दऱ्यांचे वडगांव येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:13 IST2018-01-01T19:10:32+5:302018-01-01T19:13:01+5:30
दऱ्यांचे वडगांव (ता. करवीर) येथे शेतजमिनीच्या वादातून तरुणास काठीने बेदम मारहाण केली. अमोल चंद्रशेखर चव्हाण (वय २८, रा. नंदवाळ, ता. करवीर) हा जखमी झाला. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी संशयित बबन बापू पोवार, सौरभ बबन पोवार, जीवन बबन पोवार (सर्व रा. दऱ्यांचे वडगांव, ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

कोल्हापूर : शेतजमिनीच्या वादातून तरुणास मारहाण, तिघांवर गुन्हा : दऱ्यांचे वडगांव येथील घटना
कोल्हापूर : दऱ्यांचे वडगांव (ता. करवीर) येथे शेतजमिनीच्या वादातून तरुणास काठीने बेदम मारहाण केली. अमोल चंद्रशेखर चव्हाण (वय २८, रा. नंदवाळ, ता. करवीर) हा जखमी झाला. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी संशयित बबन बापू पोवार, सौरभ बबन पोवार, जीवन बबन पोवार (सर्व रा. दऱ्यांचे वडगांव, ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
अधिक माहिती अशी, दऱ्याचे वडगांव येथे अमोल चव्हाण याची शेती आहे. ३१ डिसेंबरला तो आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचनच्या पाईप जोडत असताना संशयित बबन पोवार, सौरभ पोवार, जीवन पोवार हे तिघेजण शेतामध्ये आले.
त्यांनी पैसा जास्त झाला आहे काय असे म्हणून लाथा-बुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. त्यामध्ये अमोल जखमी झाला. सीपीआर रुग्णालयात उपचार घेऊन त्याने करवीर पोलिसांत फिर्याद दिली.