कोल्हापूर : फुलेवाडीत सराफ दूकान फोडले, सव्वा किलो चांदीचे दागिन्यास रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 16:17 IST2018-10-31T16:15:45+5:302018-10-31T16:17:42+5:30
फुलेवाडी रिंगरोडवरील जोतिर्लिंग ज्वेलर्सचे शटर उचकटून चोरट्यांनी सव्वाबारा किलो चांदीचे दागिने व तीन हजार रोकड लंपास केल्याचे मंगळवारी (दि.३०) उघडकीस आले.

कोल्हापूर : फुलेवाडीत सराफ दूकान फोडले, सव्वा किलो चांदीचे दागिन्यास रोकड लंपास
कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडवरील जोतिर्लिंग ज्वेलर्सचे शटर उचकटून चोरट्यांनी सव्वाबारा किलो चांदीचे दागिने व तीन हजार रोकड लंपास केल्याचे मंगळवारी (दि.३०) उघडकीस आले.
अधिक माहिती अशी, फुलेवाडी रिंगरोडवर एका लॉनच्या शेजारी रमेश महादेव लवटे (वय ४८, रा. फुलेवाडी) यांचे जोतिर्लिंग ज्वेलर्सचे दूकान आहे. २८ आॅक्टोंबरला रात्री दूकान बंद करुन ते घरी गेले. दूसऱ्यादिवशी दूपारी ते दूकान उघडण्यासाठी आले असता शटरचे कुलूप तुटलेले दिसले.
आतमध्ये पाहिले असता चांदीच्या गणपतीच्या मूर्ती, किरीट, झुल मोदक, पानविडा, हार असे सुमारे सव्वा किलो चांदीचे दागिने व तीन हजार रुपये चोरुन नेलेचे दिसून आले. त्यांनी याबाबत जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा माग पोलीस काढत आहेत.