Kolhapur: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये मंगळवारपासून मोफत सेवा
By समीर देशपांडे | Updated: August 12, 2023 22:51 IST2023-08-12T22:51:01+5:302023-08-12T22:51:35+5:30
Kolhapur: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यांमधील सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये मंगळवार १५ ऑगस्टपासून मोफत उपचार सेवा देण्यात येणार आहे.

Kolhapur: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये मंगळवारपासून मोफत सेवा
- समीर देशपांडे
कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यांमधील सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये मंगळवार १५ ऑगस्टपासून मोफत उपचार सेवा देण्यात येणार आहे.
३ ऑगस्ट २०२३ रोजी मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अधिवेशनामध्ये मोफत उपचाराची घोषणा केली होती. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने शनिवारी याबाबतच्या सूचनांचे परिपत्रक काढले. त्यानुसार या सर्व रुग्णालयांमध्ये कोणत्याही स्वरूपाचे शुल्क आकारणी करण्यात येणार नाही. याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर ही समितीची स्थापना करण्यात आली आहे