कोल्हापूर : पूर्व वैमन्स्यातून महिलेवर हल्ला, तरुणास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 16:22 IST2018-10-19T16:19:58+5:302018-10-19T16:22:01+5:30
राजेंद्रनगरमध्ये पूर्व वैमन्स्यातून दगडाने केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली. अंकीता करण शिंदे (वय १९) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपूरी पोलीसांनी संशयित संतोष नवनाथ गवळी (२५, रा. राजेंद्रनगर) याला गुरुवारी (दि. १८) अटक केली.

कोल्हापूर : पूर्व वैमन्स्यातून महिलेवर हल्ला, तरुणास अटक
कोल्हापूर : राजेंद्रनगरमध्ये पूर्व वैमन्स्यातून दगडाने केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली. अंकीता करण शिंदे (वय १९) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपूरी पोलीसांनी संशयित संतोष नवनाथ गवळी (२५, रा. राजेंद्रनगर) याला गुरुवारी (दि. १८) अटक केली.
अधिक माहिती अशी, फिर्यादी अंकीता शिंदे ह्या गुरुवारी दूपारी राजेंद्रनगर येथील एका किरणा दूकानात बाजार आणण्यासाठी गेल्या होत्या.
संशयित संतोष याच्या भाचीला अंकीताचा भाचा पृथ्वीराज मस्के याने वर्षभरापूर्वी पळवून नेले होते. तिने काही महिन्यांनी आत्महत्या केली. याचा राग मनात धरुन संशयिताने अंकीता यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.