Kolhapur football matches: ‘पीटीएम-शिवाजी’ हाय व्होल्टेज लढत, फुटबॉलप्रेमींची तुडूंब गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 18:18 IST2022-03-24T17:34:09+5:302022-03-24T18:18:09+5:30

कोल्हापूर : के.एस.ए.वरिष्ठ गट फुटबाॅल लीग स्पर्धेतील विजेतेपदासाठी पाटाकडील तालीम मंडळ (अ) व शिवाजी तरुण मंडळ यांच्यात लढत सुरु ...

Kolhapur football matches PTM-Shivaji’ high voltage fight, huge crowd of spectators | Kolhapur football matches: ‘पीटीएम-शिवाजी’ हाय व्होल्टेज लढत, फुटबॉलप्रेमींची तुडूंब गर्दी

छाया - नसीर अत्तार

कोल्हापूर : के.एस.ए.वरिष्ठ गट फुटबाॅल लीग स्पर्धेतील विजेतेपदासाठी पाटाकडील तालीम मंडळ (अ) व शिवाजी तरुण मंडळ यांच्यात लढत सुरु आहे. दुपारी ४ वाजता या हाय व्होल्टेज सामन्यास सुरुवात झाली आहे. हा सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे मैदान अक्षरश: तुंडूब भरले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मैदानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 
स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर शिवाजी तरुण मंडळाचे १३, तर पाटाकडील तालीम मंडळ (अ)चे बारा गुण झाले आहेत. आजच्या सामन्यास दोन्ही संघांच्या समर्थकांची मोठी गर्दी अपेक्षित होते. या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा पोलिसांनी दोन्ही संघांच्या पदाधिकारी व प्रमुख नागरीकांची बैठक पोलीस ठाण्यात घेतली होती.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सरकारने निर्बधांमध्ये शिथीलता आणली. यानंतर मैदानी स्पर्धेला सुरुवात झाली. दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर स्पर्धा पुन्हा सुरु झाल्याने खेळाडूसह प्रेक्षक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले. निर्बध शिथील होताच कोल्हापुरात फुटबॉल सामन्याना सुरुवात करण्यात आली. अन् सुनेसुने झालेले मैदान प्रेक्षकांनी पुन्हा फुलून गेले.

Web Title: Kolhapur football matches PTM-Shivaji’ high voltage fight, huge crowd of spectators