शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Kolhapur Flood: महापूर निवारणासाठी जागतिक बँकेकडून निधी मिळणार; खासदार धैर्यशील माने यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 17:19 IST

महापुराच्या निवारणासाठी शिरोळ तालुक्यात ए.आय. तंत्रज्ञानाचा प्रथम प्रयोग राबविण्याबाबत विचार

नृसिंहवाडी : महापुराच्या निवारणासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातुन अद्ययावत ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून प्रथमच शिरोळ तालुक्यात हा प्रयोग राबविण्याबाबत विचार सुरू आहे. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसत असल्याने हा प्रयोग प्रभावी ठरणार आहे. तसेच महापूर निवारणासाठी जागतिक बँकेकडून निधी मिळणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. नृसिंहवाडीत महापूर स्थितीची पाहणी करुन पूरग्रस्तांशी संवाद साधला. कृष्णा नदीची जलप्रणाली ही दोन राज्यांमध्ये असल्याने समन्वयासाठी संबंधित ठिकाणी तज्ञ अभियंत्यांची टीम कार्यरत आहे. मुख्यमंत्र्यांशी या विषयावर माझी सखोल चर्चा झाली असून लोकसभेमध्ये हा प्रश्न मी केंद्र शासनाकडे मांडला आहे." असेही खासदार माने यांनी यावेळी सांगितले. ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, महावितरणच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना महापूर काळात ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर, आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, सरपंच चित्रा सुतार, उपसरपंच रमेश मोरे, सदस्य धनाजीराव जगदाळे, शशिकांत बड्ड-पुजारी, सागर धनवडे, अभिजीत जगदाळे, प्रवीण दळवी, अमर नलावडे, सागर मोरबाळे, प्रवीण आणुजे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.सुरक्षित राहण्याचे आवाहनमहाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या योग्य समन्वय सुरु असून खा. माने यांनी सर्वांनी सुरक्षित राहून पुराच्या पाण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

ए. आय. तंत्रज्ञानामुळे कृष्णा नदीत पडणाऱ्या पावसाची माहिती जलद मिळणार असून मानवी चुका टाळल्या जाणार आहेत. शाहुवाडी, पन्हाळा भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. पंचगंगा, दूधगंगा नद्यांसह कृष्णा नदीचा काठ ढासळत आहे. या तंत्रज्ञानामुळे या सर्व गोष्टीचे रीडिंग अचूकपणे मिळणार आहे.  - धैर्यशील माने , खासदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरdhairyasheel maneधैर्यशील माने