कोल्हापूर : पाच लाखांच्या खंडणीसाठी तरुणास मारहाण, पाचजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 17:23 IST2019-01-09T17:20:36+5:302019-01-09T17:23:05+5:30

पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी तरुणास मारहाण करून जबरदस्तीने कार घेऊन जाणाऱ्या पाच जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित अक्षय कांबळे (रा. हुपरी, ता. हातकणंगले) व त्याच्या चार अनोळखी साथीदारांचा समावेश आहे.

Kolhapur: Five lakhs ransom ransacked, five offenders | कोल्हापूर : पाच लाखांच्या खंडणीसाठी तरुणास मारहाण, पाचजणांवर गुन्हा

कोल्हापूर : पाच लाखांच्या खंडणीसाठी तरुणास मारहाण, पाचजणांवर गुन्हा

ठळक मुद्देपाच लाखांच्या खंडणीसाठी तरुणास मारहाणपाचजणांवर गुन्हा, शाहूपुरी पोलिसांत फिर्याद

कोल्हापूर : पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी तरुणास मारहाण करून जबरदस्तीने कार घेऊन जाणाऱ्या पाच जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित अक्षय कांबळे (रा. हुपरी, ता. हातकणंगले) व त्याच्या चार अनोळखी साथीदारांचा समावेश आहे.

अधिक माहिती अशी, फिर्यादी स्वप्नील भारत भोसले (वय ३१, रा. चौगले कॉलनी, कसबा बावडा) यांची शाहूपुरी बसंत-बहार रोड परिसरात नारायणी टॉवर येथे लॅबोरेटरी आहे. त्यांना १0 दिवसांसाठी तीन लाख रुपयांची गरज होती. ओळखीचा मित्र युवराज कुरडे याच्यामार्फत अक्षय कांबळे याच्याकडून १० टक्के व्याजाने तीन लाख रुपये घेतले.

पैसे दिले नाही, तर ठार मारण्याची धमकी दिली. भोसले यांच्या खिशातून कारची चावी काढून घेऊन, कार जबरदस्तीने पळवून नेली. त्यानंतर आठ जानेवारीला शाहूपुरी येथील लॅबमध्ये येऊन दंगा करीत पार्किंगमध्ये बोलावून भोसले यांना पाच लाख रुपये दे, अन्यथा वाईट परिणाम होतील, असे धमकावत बेदम मारहाण केली. या त्रासाला कंटाळून भोसले यांनी शाहूपुरी पोलिसांत मंगळवारी (दि. ८) फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: Five lakhs ransom ransacked, five offenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.