शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांचे केले; पण जनतेचे पॅचअप कसे कराल..? - सतेज पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 17:48 IST

विरोधी उमेदवाराची निष्क्रियताच केंद्रस्थानी

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराची निष्क्रियता व नाराजीच या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. ही उमेदवारांबद्दलची नाराजी दूर करायला मुख्यमंत्र्यांना दोन दोन दिवस कोल्हापुरात राहावे लागते. ते नेत्यांचे पॅचअप करू शकतील; पण जनतेचे कसे करणार, असा सवाल महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे उपस्थित केला.महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत आमदार पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीच्या उमेदवाराची निष्क्रियता कोल्हापूरने पाच वर्षे अनुभवली आहे. त्यांची उमेदवारी घटक पक्षांनाच मान्य नाही. भाजपचे महेश जाधव उमेदवाराबद्दल जाहीरपणे काय बोलले हे उभ्या महाराष्ट्राने ऐकले. या नाराजीवर पॅचअप करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना दोन दोन दिवस इथे राहावे लागतेय. त्यांनी नेत्यांचे पॅचअप जरूर केले; पण ते जनतेचे पॅचअप करू शकणार नाहीत. कोल्हापूरची निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. आणि कोल्हापुरात एकदा एखादी गोष्ट जनतेनेच हातात घेतली की काय होते याचा अनुभव महाराष्ट्राला अनेकदा आला आहे. यंदाच्या निवडणुकीतही त्याचाच प्रत्यंतर आल्याशिवाय राहणार नाही. राजा विरुध्द रयत असे स्वरुप काही लोक या निवडणुकीला देण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु अर्ज भरायला आलेली रयत पाहिल्यानंतर त्याचे वेगळे उत्तर देण्याची गरज नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस