शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

कोल्हापूर : ‘साउंड सिस्टीम’ला बगल दिल्याने ध्वनिप्रदूषणात घट- कोल्हापूर विसर्जन मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 1:07 AM

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीमला तरुण मंडळांनी यावर्षी बगल दिल्याचा सकारात्मक परिणाम कोल्हापुरात झाला आहे; त्यामुळे मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण घटले.

ठळक मुद्देपर्यावरणशास्त्र विभागाकडून शहरातील २२ ठिकाणी मापन

कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीमला तरुण मंडळांनी यावर्षी बगल दिल्याचा सकारात्मक परिणाम कोल्हापुरात झाला आहे; त्यामुळे मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण घटले. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या पाहणीतून हे स्पष्ट झाले आहे.पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख

डॉ. पी. डी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्राध्यापक डॉ. ए. एस. जाधव, पल्लवी भोसले, विद्यार्थी चेतन भोसले,अर्णव डंबे यांनी ध्वनिपातळी मापनाचे काम केले. त्यांनी ध्वनीपातळीचे शहरात चार विभागांअंतर्गत २२ ठिकाणी मापन केले. ध्वनिमापक उपकरणाद्वारे डेसिबल या एककात त्यांनी मोजमाप केले. यावर्षी औद्योगिक विभाग वगळता शांतता, निवासी, व्यावसायिक विभागातील ध्वनिपातळी ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) मानकांपेक्षा वाढलेली आहे; पण अधिकतर ठिकाणी ती कमी असल्याचे या मापनातून दिसून आले.महाद्वार रोड, गुजरी कॉर्नर, पापाची तिकटी, शिवाजी पेठ, जिल्हाधिकारी कार्यालय, शाहूपुरी, वाय. पी. पोवारनगर परिसरातील ध्वनीप्रदूषणात वाढ झाली. उद्यमनगर, बिंदू चौक, मंगळवार पेठ, ‘सीपीआर’, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, गंगावेश परिसरात ध्वनीप्रदूषणात घट झाली आहे. 

मिरवणुकीतील या ध्वनिपातळीत लोकांची रहदारी, स्टिरिओ साउंड, ढोल-ताशा, बेंजो, ट्रॅक्टर, जनरेटरच्या आवाजाचा समावेश आहे. मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीमचा वापर झाला नसल्याने शहरातील अधिकतर ठिकाणचे ध्वनिप्रदूषण घटले आहे.- डॉ. पी. डी. राऊत, विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र

टॅग्स :pollutionप्रदूषणGanpati Festivalगणेशोत्सव