कोल्हापूर जिल्हा कोषागार कार्यालयाने दिली १० हजार ५४० कोटींची बिले, शासनाकडे ६११ कोटींचा महसूल जमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:10 IST2025-04-09T18:10:11+5:302025-04-09T18:10:26+5:30
कोल्हापूर : जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा कोषागार कार्यालयाने सन २०२४-२५ या मागील आर्थिक वर्षात १० हजार ५४० कोटी ...

कोल्हापूर जिल्हा कोषागार कार्यालयाने दिली १० हजार ५४० कोटींची बिले, शासनाकडे ६११ कोटींचा महसूल जमा
कोल्हापूर : जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा कोषागार कार्यालयाने सन २०२४-२५ या मागील आर्थिक वर्षात १० हजार ५४० कोटी ९१ लाख ७१ हजार ०६७ एवढ्या भरभक्कम रकमेची बिले अदा केली आहेत, तर विभागामार्फत शासनाकडे ६११ कोटी १० लाख ६० हजार ३९७ रुपये महसूल मिळाला आहे.
शासनाकडून केल्या जाणाऱ्या सर्व कामांची बिले जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत अदा केली जातात. विभाग कोणताही असो त्याचे बिल कोषागारमधून निघते, त्यामुळे मार्च महिन्याचा सर्वाधिक ताण या कार्यालयावर येतो. मागील आर्थिक वर्षात या कार्यालयाने १० हजार ५४० कोटी ९१ लाख ७१ हजार ०६७ रकमेची बिले अदा केली आहेत.
मार्चमध्ये सर्वाधिक १४६८ कोटी
मागील आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात या कार्यालयाने १४६८ कोटी ६९ हजार ५० हजार ४०३ एवढ्या रकमेची बिले अदा केली आहेत.
महिना | जमा महसूल | अदा झालेली बिले |
एप्रिल २०२४ | ४८,६३,२२३८६ | १०,२२,३२,०४,२९० |
मे | १,०५,७३,९२,६७९ | ७,४७,०२०९,३७१ |
जून | ४३,०८,२१,७०९ | ३,२१,८५,१८,२८५ |
जूलै | ३३,१०,४३,७५१ | ११,०५,२७,९५,२६१ |
ऑगस्ट | ७२,०५,५५,३३८ | ९,९३,७९,१४,४१२ |
सप्टेंबर | २५,०४,४८,२४१ | ८,९५,१६,४२,३२७ |
ऑक्टोबर | २८,२४,६२,१५० | ११,९२,७९,७१,५१९ |
नोव्हेंबर | २७,४९,८०,२०४ | ३,६७,४६,९२,२७० |
डिसेंबर | ५४,७९,४९,८५६ | ७,८७,६३,४१,८५० |
जानेवारी २०२५ | ३८,६६,९८,४३६ | ८,००,१४,४३,२६५ |
फेब्रुवारी | ३५,२९,११,७७० | ८,३८,७४,८७,८१४ |
मार्च | ९८,९४,७३,८७७ | १४,६८,६९,५०,४०३ |
एकूण : ६११ कोटी, १० लाख ६० हजार ३९७ : १० हजार ५४० कोटी ९१ लाख ७१ हजार ०६७