‘सीसीटीएनएस’ कामगिरीमध्ये महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:10 IST2021-02-05T07:10:26+5:302021-02-05T07:10:26+5:30
कोल्हापूर : ‘सीसीटीएनएस’ या संगणकीय प्रणालीत गुन्ह्यांची माहिती भरणे, गुन्ह्यांचा आढावा घेणे, सिटिझन पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निरसन करणे, ...

‘सीसीटीएनएस’ कामगिरीमध्ये महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा अव्वल
कोल्हापूर : ‘सीसीटीएनएस’ या संगणकीय प्रणालीत गुन्ह्यांची माहिती भरणे, गुन्ह्यांचा आढावा घेणे, सिटिझन पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निरसन करणे, त्यांची निर्मिती करणे, तसेच गुन्हे प्रकटीकरण व प्रतिबंधात्मक कारवाई यांची माहिती संकलित करून ती संगणकीय प्रणालीवर भरण्यामध्ये महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याने २३९ गुणांपैकी २२७ गुण मिळवून अव्वल स्थान मिळवले, तर २२१ गुण मिळवून सातारा जिल्ह्याने तिसरे स्थान प्राप्त केले. दुसरे स्थान चंद्रपूर जिल्ह्याने २२२ गुण मिळवत प्राप्त केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील सीसीटीएनएस प्रणालीचे कार्य अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी कोल्हापूर पोलीस दलास २०२० करिता महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली, त्याकरिता गौरविले आहे. या कामगिरीबद्दल सीसीटीएनएस प्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरी मिळविल्याबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. तिरुपती काकडे व सीसीटीएनएस प्रणालीमध्ये कर्तव्यास असणाऱ्या सर्व पोलिसांचे अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अभिनंदन केले.