शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

कोल्हापूर : ‘कोजिमाशि’ मतदानावेळी 'सरांना' पोलिसांची 'छडी'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 11:50 AM

गेले पंधरा दिवस ऐन पावसात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पतसंस्थेच्या कारभाराबरोबरच व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली होती.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या (कोजिमाशि) निवडणुकीसाठी आज, शनिवारी मतदान होत आहे. पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व न्यू मराठी हायस्कूल या शाळांतील २२ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. यावेळी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल केंद्रावर आसगावकर पॅनेलचे मतदार मतदानासाठी एकजुटीने आले. दरम्यान, गोंधळ झाला असता पोलिसांनी सरांच्यावरच लाठीमार केला. यावेळी मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला.‘कोजिमाशि’साठी शिक्षक नेते दादा लाड यांच्या नेतृत्वखालील सत्तारूढ स्वाभिमानी आघाडी व शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडी यांच्यात सरळ लढत होत आहे. गेले पंधरा दिवस ऐन पावसात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पतसंस्थेच्या कारभाराबरोबरच व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली होती. साम, दाम, दंड या नीतीचा दोन्ही पॅनलकडून वापर झाला. त्यामुळे ‘सर’ कोणाच्या पदरात आपले मताचे दान टाकणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. उद्या, रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी होणार आहे.शहर, हातकणंगले, करवीर, कागलवर मदारपतसंस्थेचे ८५२० सभासद आहेत. त्यांपैकी सर्वाधिक १६७४ हे हातकणंगले तालुक्यातील आहेत. कागल ९२६, करवीर ८९२, तर कोल्हापूर शहरात ८३३ मतदार आहेत. त्यामुळे दोन्ही पॅनलकडून चार ठिकाणीच ताकद लावली गेली. येथे कोण बाजी मारणार, त्याचीच सत्ता पतसंस्थेत येणार, हे निश्चित आहे.तालुकानिहाय मतदान असे कोल्हापूर शहर - ८३३, करवीर - ८९२, हातकणंगले - १६७४, कागल - ९२६, राधानगरी - ६२९, भुदरगड - ५५५, पन्हाळा - ७१७, शाहूवाडी - ३५४, शिरोळ - ७००, गडहिंग्लज - ४२१, आजरा - २०७, चंदगड - ३९०, गगनबावडा - १४०, स्वामी शिक्षण संस्था -७६, रयत शिक्षण संस्था- ६

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकTeacherशिक्षक