शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत आरोग्य विभागाच्या पुरस्कारांचे वितरण, बाळासाठी स्तनपान महत्वाचे :सतीश पत्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 19:33 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी राजर्षी शाहू सभागृहामध्ये त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरण व अधिकारी कमर्चाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी प्रसिध्द स्त्रीरोगतजज्ञ डॉ.सतीश बोलत होते.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेत आरोग्य विभागाच्या पुरस्कारांचे वितरणबाळासाठी स्तनपान महत्वाचे :सतीश पत्की

कोल्हापूर : बाळाच्या निकोप वाढीसाठी स्तनपान हे नैसर्गिक वरदान असून बालकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक मातेच्या दुधात असल्याने याला महत्व दिले जावे अशी अपेक्षा प्रसिध्द स्त्रीरोगतजज्ञ डॉ.सतीश पत्की यांनी व्यक्त केली.कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी राजर्षी शाहू सभागृहामध्ये त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरण व अधिकारी कमर्चाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी डॉ. पत्की बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, आरोग्य समितीचे सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, शिक्षण सभापती अंबरिष घाटगे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.डॉ. पत्की म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सोयी गावागावापर्यंत पोहोचल्याने दवाखान्यात होणाऱ्या प्रसुती संख्येत वाढ झाली आहे. गरोदर मातेपासून ते प्रसुती झालेल्या मातेपर्यंतच्या सर्व नोंदी उपलब्ध झाल्याने त्यांच्या आरोग्याबाबत अधिक दक्षता घेणे सोयीचे झाले आहे.यावेळी शौमिका महाडिक म्हणाल्या, या पुरस्कारांनी गौरवण्यात येणारे दवाखाने, तेथे काम करणारे अधिकारी, कर्मचारी हे अभिनंदनास पात्र आहेत. महिलांकडून आपल्याच आरोग्याची अनेकदा हेळसांड होते. मात्र चांगला संसार करण्यासाठी आपले आरोग्य उत्तम राहणे आवश्यक असल्याने त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. समतोल आहार, चांगल्या आरोग्य सवयी व वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीचा सर्वांनी अवलंब करावा.डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याचे आरोग्य उत्तम ठेवण्यामध्ये अधिकारी,कमर्चारी यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. कुठलेही काम करीत असतांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास कोणतेही काम चांगले होते.आरोग्य सभापती सर्जेराव पाटील म्हणाले, ग्रामीण जनतेला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देऊन त्यांच्या विकासामध्ये योगदान द्यावे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एफ. ए. देसाई यांनी आभार मानले.

यावेळी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ हर्षला वेदक, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ विनोद मोरे, आरोग्य समिती सदस्या सुनिता रेडेकर, सुनिता भाटळे, शिल्पा पाटील, पुष्पा रेडेकर, बांधकाम समिती सदस्य हंबीरराव पाटील, उपसंचालक आरोग्य डॉ. पी.पी. धारुरकर उपस्थित होते. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर