शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिक्षक संघटनानी आपसातामधील मतभेद मिटवावा, कोल्हापूर शिक्षण वाचवा नागरी कृती समिती बैठकीत सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 16:30 IST

मतभेद, सत्ता स्पर्धा, संघर्ष, असूया, मत्सर, हेवेदावे हे सर्व राजकीय पक्षात असतात, मात्र या सार्या गोष्टी आता शिक्षक संघटनांमध्येही दिसू लागल्या आहेत. सर्व शिक्षक संघटना या गोष्टींना तिलांजली देवून एकत्र आल्या तरच सामान्य लोक साथ देतील असा सूर कोल्हापूर शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या बैठकीत उमटला.

ठळक मुद्देशिक्षक संघटनानी आपसातामधील मतभेद मिटवावाकोल्हापूर शिक्षण वाचवा नागरी कृती समिती बैठकीत सूर

कोल्हापूर : मतभेद, सत्ता स्पर्धा, संघर्ष, असूया, मत्सर, हेवेदावे हे सर्व राजकीय पक्षात असतात, मात्र या सार्या गोष्टी आता शिक्षक संघटनांमध्येही दिसू लागल्या आहेत. सर्व शिक्षक संघटना या गोष्टींना तिलांजली देवून एकत्र आल्या तरच सामान्य लोक साथ देतील असा सूर कोल्हापूर शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या बैठकीत उमटला.

राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सरकारी शाळा बंद पडून सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहणार आहे. याबाबत जनआंदोलन उभे करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्यावतीने शनिवारी मुस्लिम बोर्डिंग येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस शिक्षक संघटना, सामाजिक संस्था, नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.चंद्रकांत यादव म्हणाले, शिक्षक संघटना एकत्रित येणे अवघड आहे, मात्र या संघटना एक त्र आल्या नाहीतर सामान्य लोक या आंदोलनात पुढाकार घेणार नाहीत. त्यामुळे संगटनांनी आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, हे आंदोलन शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या पर्यंतच मर्यादित न ठेवता. हे आंदोलन गावपातळीवर पोहचले पाहिजे. कमी पटसंख्यांच्या शाळा बंद होवू नयेत, यासाठी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांची भेट घेवून आपली भूमिका मांडणे गरजे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कमी पटसंख्या शाळा बंद करू नये याबाबतचा ठराव करावा.राजेंद्र कोरे म्हणाले, या आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करणे गरेजे आहे. यावेळी गणी आजरेकर, डॉ. सुभाष जाधव, किशोर घाडगे यांनी सूचना मांडल्या. कृती समितीचे राज्य समन्वयक गिरीष फोंडे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश वरक, ब्लॅक पँथरचे संस्थापक सुभाष देसाई, प्राचार्य. टी. एस. पाटील, अ‍ॅड. पंडीतराव सडोलीकर,अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, पी. आर. गवळी, रामभाऊ कोळेकर, महादेव जाधव, बी. एस. खामकर, प्रसाद पाटील,सुवर्णा तळेकर,शिक्षक संघटना, सामाजिक संस्था, नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती

मंगळवारी ‘मौन’ आंदोलनकोल्हापूर शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्यावतीने मंगळवारी, महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त गांधी मैदान येथे मौन आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व पदाधिकारी याठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक