Kolhapur: धनंजय महाडिक, ऋतुराज पाटील एकाच व्यासपीठावर, उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 11:40 PM2023-08-18T23:40:57+5:302023-08-19T10:35:59+5:30

Kolhapur: गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे आयोजित विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उद्योग मंत्री उदय सामंत आले होते.

Kolhapur: Dhananjay Mahadik, Rituraj Patil on the same platform, Industries Minister Uday Samant said... | Kolhapur: धनंजय महाडिक, ऋतुराज पाटील एकाच व्यासपीठावर, उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले...

Kolhapur: धनंजय महाडिक, ऋतुराज पाटील एकाच व्यासपीठावर, उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले...

googlenewsNext

- सतीश पाटील 
शिरोली  - गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे आयोजित विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उद्योग मंत्री उदय सामंत आले होते. यावेळी जिल्ह्याच्या राजकारणातील कट्टर विरोधक  खासदार धनंजय महाडिक,आमदार ऋतुराज पाटील हे आज मांडीला मांडी लावून बसले होते. आणि चक्क एकमेकांशी बोलले ही.

यावेळी मंत्री सामंत म्हणाले गोकुळ शिरगाव येथे फायर ब्रिगेगसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी निधी मागितला होता. फायर ब्रिगेडसाठी १३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यांचे काम ही लवकरच सुरू होईल. पण कोल्हापूरात कधीकधी राजकीय आग देखील उठते त्यावेळी या फायर ब्रिगेडचा महाडीक आणि पाटील या दोघांनी उपयोग करावा. त्यासाठी दोन अग्नीशमनच्या गाड्या घ्याव्या लागल्या तरी चालेल एक महाडीकांना,  दुसरी पाटलांना , असे उद्योग मंत्री सावंत बोलल्यावर एकच हश्या पिकल्या.

राजकारणात मनभेद असतात आणि मतभेद ही असतात, एखाद्ये सामाजिक काम हे माझ आहे, मतदार संघातील काम आहे, जिल्ह्यातील काम आहे, लोकांचं काम आहे, असे समजून सर्व हेवेदावे बाजूला ठेवून , लोकप्रतिनिधी एकत्रित येतात त्याच भागाचा विकास होत असतो असेही मंत्री सामंत महाडीक आणि पाटील यांच्याकडे पाहून बोलले.

Web Title: Kolhapur: Dhananjay Mahadik, Rituraj Patil on the same platform, Industries Minister Uday Samant said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.