शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बदली करण्यासाठी आटापिटा..अधिकारी देताना मात्र फाटा, राजकीय उदासीनतेमुळे कोल्हापूरच्या विकासाला फटका

By भारत चव्हाण | Updated: March 30, 2023 13:54 IST

रिक्त असलेल्या पदांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दिले जात नाहीत

भारत चव्हाणकोल्हापूर : खराब रस्त्यांच्या तक्रारीवरून एका अधिकाऱ्याला त्याच्या पदावरून हटविण्यासाठी जेवढा आटापिटा केला तेवढाच आटापिटा महापालिकेकडे प्रतिनियुक्तीवर अधिकारी देण्यासाठी केला असता तर शहरातील खराब रस्ते आणि विकासाच्या कामात अडथळे निर्माण झाले नसते.

अशीच गोष्ट काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेच्या बाबतीतही घडली आहे. या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्णवेळ जल अभियंता द्या, अशी मागणी करून प्रशासन थकले आणि शेवटी आहे त्याच कर्मचाऱ्यांवर ही योजना पूर्ण करण्याचे पाळी आली आहे.अधिकाऱ्यांच्या बाबतीत ही आहे वस्तुस्थिती...कोल्हापूर शहरासाठी ४८५ कोटी खर्चाची काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजना राबविण्यात येत आहे. याच दरम्यान दुसरीकडे शहरांतर्गत अमृत योजना - १ च्या माध्यमातून दुधाळी झोनमधील ११२.९० किलोमीटरची सुमारे ६८ कोटींचा ड्रेनेज लाइन टाकण्यात येत आहे, तर अंदाजे २५० किलोमीटरची ११४ कोटी ८१ लाख रुपये खर्चाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच प्रशासकीय कामकाज प्रभावी व सक्षमपणे हाताळण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाकडील एक तज्ज्ञ अधिकारी प्रतिनियुक्तीवर द्यावा म्हणून राज्य सरकारकडे पालिका प्रशासनाने २०१६ पासून सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, या मागणीकडे सरकारने लक्ष दिले नाही.

तीन मोठी रुग्णालये, अकरा नागरी आरोग्य केंद्रे, सहा कुटुंब कल्याण केंद्रे आणि वर्षभर विविध प्रकारच्या लसीकरणाची मोहीम राबविणाऱ्या महानगरपालिकेत २०१६ पासून स्वतंत्र आरोग्याधिकारी नाहीत. ऐन कोरोनाच्या काळातही हे पद रिक्त होते. प्रतिनियुक्तीवर आरोग्याधिकारी द्यावा, अशी मागणी वारंवार झाली. मात्र, आज अखेर हे पद रिक्तच असून, पालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तात्पुरता कार्यभार सोपवून कार्यभार उरकावा लागत आहे. त्यातून अनेक अडचणींना प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे.दोन सहायक आयुक्त पदे गेल्या सात-आठ महिन्यांपासून रिक्त आहेत. राज्य सरकारकडून सहायक आयुक्तपदाची पदे प्रतिनियुक्तीवर भरली जातात. गेल्या सात-आठ महिन्यांपासून अधिकाऱ्यांची मागणी केली जात आहे, पण आजही या मागणीकडे नगरविकास विभागाने गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे त्याचा वसुलीच्या कामावर परिणाम झाला आहे. सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार पालिकेच्याच अधिकाऱ्यांवर सोपविण्याची वेळ आली. या अधिकाऱ्यांवर टाकलेल्या अतिरिक्त कार्यभारामुळे त्यांच्या मूळ कामातही अडथळे निर्माण होत आहे.दोन अतिरिक्त आयुक्तांपैकी एक पद स्थानिक अधिकाऱ्यांमधून सेवा ज्येष्ठतेने भरायचे आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना या पदावर नियुक्ती करण्यासाठी परवानगी मागणारी फाइल, नगरविकास विभागातील टेबलवर आजही प्रलंबित आहे. त्यावर अद्याप निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे प्रशासकीय कामात शिथिलता निर्माण झाली आहे.

एकीकडे रिक्त असलेल्या पदांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दिले जात नाहीत आणि दुसरीकडे मात्र एका अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आटापिटा केला जातो. असाच आटापिटा अधिकारी प्रतिनियुक्तीवर देण्याच्या बाबतीत केला असता तर कदाचित कामाची गुणवत्ता दिसली असती आणि प्रशासकीय दिरंगाई टळली असती, असे चित्र आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण