शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
3
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
4
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
5
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
6
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
7
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
8
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
9
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
10
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
11
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
12
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
13
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
14
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
15
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
17
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
18
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
19
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची ‌सिंधुदुर्गवर दणदणीत मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या १९ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अनिकेत नलवडे व स्मित पाटील यांच्या ...

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या १९ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अनिकेत नलवडे व स्मित पाटील यांच्या शतकी खेळीमुळे कोल्हापूर जिल्हा संघाने सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट संघाचा तब्बल २२५ धावांनी पराभव केला.

राजाराम काॅलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सोमवारी कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा संघ यांच्यात एकदिवशीय सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर संघाने ५० षटकांत २ बाद ३३८ धावांचा डोंगर रचला. यात अनिकेत नलवडे याने १३२, तर स्मित पाटील याने १०० धावा केल्या, तर यशवर्धन पाटील याने नाबाद ५८ व हर्षवर्धन जाधव याने नाबाद १३ धावा केल्या. गोलंदाजी करताना सिंधुदुर्गच्या यश गाडेकरला केवळ एक बळी घेता आला. उत्तरादाखल खेळताना सिंधुदुर्ग संघाला हे आव्हान पेलवले नाही. कोल्हापूरकडून क्षितिज पाटील याने चार, प्रथमेश बाजारी व अभिषेक निषाद यांनी प्रत्येकी दोन व तुषार पाटील व श्रेयश चव्हाण याने प्रत्येकी एक बळी घेतला. कोल्हापूर संघाच्या भेदक गोलंदाजीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. केवळ यश धाडीने ५५ धावा करीत एकाकी किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. त्यास निलंग नाईक याने ११ व तन्मय चिंदरकर याने १० धावा करीत साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भेदक गोलंदाजी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सिंधुदुर्गचा संघ २५.१ षटकांत सर्वबाद ११३ धावांत गुंडाळला. त्यामुळे हा सामना तब्बल २२५ धावांनी कोल्हापूर संघाने जिंकला. संघाचा हा स्पर्धेतील दुसरा विजय आहे.

फोटो : ०८०३२०२१-कोल-अनिकेत नलवडे

फोटो : ०८०३२०२१-कोल-स्मित पाटील