कोल्हापूर :लोकसभेवर डोळा ठेवूनच ऊसदराचा निर्णय : शामराव देसाई यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:49 IST2018-11-14T16:48:11+5:302018-11-14T16:49:45+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या घोषित मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून यंदाच्या हंगामात उसाच्या पहिल्या उचलीचा निर्णय घेतल्याची टीका जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केली. त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.

कोल्हापूर :लोकसभेवर डोळा ठेवूनच ऊसदराचा निर्णय : शामराव देसाई यांची टीका
कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या घोषित मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून यंदाच्या हंगामात उसाच्या पहिल्या उचलीचा निर्णय घेतल्याची टीका जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केली. त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.
पत्रकात ते म्हणतात, ‘कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे ऊसदराच्या तीन हजार रुपयांवर एकमत होऊन कारखाने सुरू झाले. एकीकडे साखरेचा सध्याचा आंतरराष्ट्रीय बाजारातील दर एकवीसपर्यंत खाली घसरला आहे.
दुसरीकडे प्रक्रिया खर्च, कर्जाचे व व्याजाचे हप्ते आणि बँकांची उचल ८५ टक्के असल्याने आपण उसाला १८०० ते २००० रुपयेच देऊ शकू; अन्यथा कारखाने बंद ठेवू, असे म्हणणारे कारखानदार आणि गेली १० वर्षे उसाला एकरकमी पहिला हप्ता ३५०० रुपये घेऊ असे म्हणणारे आणि तो दर कधीही न घेऊ शकलेले नेते आता तीन हजार रुपयांवर कसे एकत्र आले? साखर उद्योगास इथेनॉल निर्मितीतून चांगले पैसे मिळणार आहेत; म्हणूनच त्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे.’