गुदद्वारात हवा सोडल्याने कामगाराचा मृत्यू, हेर्ले येथील फौंन्डीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 19:08 IST2018-09-19T18:41:40+5:302018-09-19T19:08:38+5:30
कोल्हापूर-सांगली रोडवरील अतिग्रे येथील फौंन्ड्रीमध्ये काम करताना सुपरवायझरने चेष्टेने गुदद्वारात हवा सोडल्याने बेशुध्द पडलेल्या कामगाराचा खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री दूर्देवी मृत्यू झाला. आदित्य दत्तात्रय जाधव (वय २९, रा. हेर्ले, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.

गुदद्वारात हवा सोडल्याने कामगाराचा मृत्यू, हेर्ले येथील फौंन्डीतील घटना
कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली रोडवरील अतिग्रे येथील फौंन्ड्रीमध्ये काम करताना सुपरवायझरने चेष्टेने गुदद्वारात हवा सोडल्याने बेशुध्द पडलेल्या कामगाराचा खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री दूर्देवी मृत्यू झाला. आदित्य दत्तात्रय जाधव (वय २९, रा. हेर्ले, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.
एकुलत्या मुलाच्या मृत्यूने जाधव कुटूंबिय उघड्यावर पडले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहुपूरी पोलीसांनी कारखान्यातील संशयित सुपरवायझरवर गुन्हा दाखल केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलीसांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये हवा सोडलेनंतर काही सेंकदात आदित्य जमिनीवर कोसळल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अधिक माहिती अशी, आदित्य जाधव याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. आई-वडील शेती करतात. घरी तो आणी बहिण असे चौघेजण राहत होते. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने तो अतिग्रे येथील एका फौंन्ड्रीमध्ये कामाला जात होता. नेहमीप्रमाणे ३ सप्टेंबर रोजी रात्रड्युटीवर तो गेला.
मध्यरात्री तो बेशुध्द पडल्याने येथील कामगारांनी त्याला इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृत्ती गंभीर असलेचे पाहून येथील डॉक्टरांनी त्याला कोल्हापूरला हलविण्यास सांगितले. त्यानुसार नागाळा पार्क येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. आदित्यला यापूर्वी कसलाच त्रास नव्हता. अचानक तो बेशुध्द कसा पडला.
यासंबधी नातेवाईकांनी कारखान्यामध्ये नेमका काय प्रकार घडला याची माहिती घेतली. येथील व्यवस्थापकाने कारखान्यातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता मध्यरात्री तीनच्या सुमारास काम सुरु असताना आदित्य संबधीत सुपरवायझर जवळ आला. यावेळी त्याने आदित्यच्या केसावर, कपड्यावर हवा मारत असताना चेष्टेने प्रेशरने गुदद्वारात हवा सोडली.
अचानक जोराचा धक्का बसून तो खाली कोसळला. यावेळी सुरपवायझरने कोणताही गाजावाजा न करता त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतू आदित्य निपचीत पडला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार उजेडात आला. घटनेपासून संशयित सुपरवायझर गायब आहे.
पाहा व्हिडीओ -