शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
4
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
5
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
6
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
7
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
8
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
10
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
11
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
12
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
13
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
14
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
15
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
16
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
17
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
18
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
19
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
20
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं

कोल्हापूर : स्कूल बस अपघातातील जखमी मदतनिसाचा अखेर मृत्यू , मृतांची संख्या चारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 18:15 IST

कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील चोकाक (ता. हातकणंगले) येथील कंटेनर-स्कूल बस अपघातातील गंभीर जखमी असलेल्या मदतनिसाचा अखेर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. हृषीकेश दयानंद कांबळे (वय ३१, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. या दुर्घटनेने पुन्हा एकदा मुडशिंगी गावावर दु:खाचे सावट पसरले. ​​​​​​​

ठळक मुद्देस्कूल बस अपघातातील जखमी मदतनिसाचा अखेर मृत्यू , मृतांची संख्या चारवरएकुलत्या मुलाचा मृत्यू, अवयवदान करता आले नाही

कोल्हापूर/गांधीनगर : कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील चोकाक (ता. हातकणंगले) येथील कंटेनर-स्कूल बस अपघातातील गंभीर जखमी असलेल्या मदतनिसाचा अखेर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. हृषीकेश दयानंद कांबळे (वय ३१, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. या दुर्घटनेने पुन्हा एकदा मुडशिंगी गावावर दु:खाचे सावट पसरले.

हृषीकेश दयानंद कांबळेतीन दिवसांपूर्वी कंटेनर-स्कूल बस यांच्यात अपघात झाला. त्यामध्ये स्कूल बस चालक, कंटेनर चालक व क्लीनर हे तिघे ठार झाले; तर २२ विद्यार्थी जखमी झाले. त्यांच्यावर शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आतापर्यंत १७ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पाच विद्यार्थी उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. स्कूल बसमधील मदतनीस हृषीकेश कांबळे यांच्या डोक्यास गंभीर मार लागला होता. त्यांचा शुक्रवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात आतापर्यंत मृतांची संख्या चारवर गेली आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.अवयवदान करता आले नाहीमृत कांबळे यांच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी बंगलोर व मुंबई येथील डॉक्टरांची विशेष पथके कोल्हापुरात आली. त्यांनी मृतदेह पाहिला असता सर्व अवयव निकामी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अवयवदान करता आले नाही. हृषीकेशवर वयाच्या दुसऱ्या वर्षी हृदय शस्त्रक्रिया झाली होती. सीपीआर रुग्णालयातील सर्जरी झालेला पहिला मुलगा असल्याने त्याचा तत्कालीन आरोग्यमंत्री स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.एकुलत्या मुलाचा मृत्यूहृषीकेश कांबळे याचे वडील खासगी सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. आई-वडील आणि बहीण असे त्याचे कुटुंब. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने वयाच्या दुसऱ्या वर्षापासून तो आजोळ कुंभोज (ता. हातकणंगले) येथे आजोबा बापूसाहेब भोसले यांच्याकडे राहत होता. त्याने पदवीच्या कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण सोडले.

गेल्या सहा वर्षांपासून संजय घोडावत स्कूलमध्ये वॉर्डबॉय म्हणून तो नोकरी करीत होता. दुसऱ्यांना मदत करणारा, शांत आणि मनमिळावू असा त्याचा स्वभाव होता. एकुलत्या मुलाच्या मृत्यूने कांबळे कुटूंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरSchoolशाळाhospitalहॉस्पिटल