शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : तरुणाच्या बेजबाबदारीमुळे वृध्दाचा हकनाक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 13:35 IST

शिवाजी पेठेतील लाड चौकामध्ये दूचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृध्दाला रुग्णालयात दाखल न करता रंकाळा परिसरात रस्त्यावर सोडून त्यांच्याच खिशातील पैसे घेवून अज्ञात तरुणाने पोबारा केला.

ठळक मुद्देकोल्हापूर : तरुणाच्या बेजबाबदारीमुळे वृध्दाचा हकनाक मृत्यूअपघातानंतर रुग्णालयात न घेता रस्त्यावर दिले सोडून माणुसकीला काळीमा फासणारी घटना

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील लाड चौकामध्ये दूचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृध्दाला रुग्णालयात दाखल न करता रंकाळा परिसरात रस्त्यावर सोडून त्यांच्याच खिशातील पैसे घेवून अज्ञात तरुणाने पोबारा केला.दरम्यान वेळेत उपचार न मिळालेने वृध्दाचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु असताना दूर्देवी मृत्यू झाला. शंकरराव रामचंद्र मोरे (वय ७७, रा. धोत्री गल्ली, गंगावेश, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. अज्ञात तरुणाचे कृत माणुकसीला काळीमा फासणारे असून याबाबत तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. संशयित तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा जुनाराजवाडा पोलीस शोध घेत आहेत.

अधिक माहिती अशी, शंकरराव मोरे हे टिंबर मार्केट येथे सुतारकाम करीत होते. नेहमीप्रमाणे ते १० जुलै रोजी कामावरुन दूपारी साडेबाराच्या सुमारास चालत घरी जात होते. शिवाजी पेठेतील लाड चौकामध्ये एका अज्ञात मोटारसायकलने त्यांना मागून जोराची धडक दिली. त्यामध्ये मोरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.

पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन ते बेशुध्द पडले. संबधीत तरुणाने त्यांना उचलून एका रिक्षामध्ये घातले. यावेळी याठिकाणी जमा झालेल्या लोकांना आजोबांना रुग्णालयात घेऊन जातो असे सांगून घेवून गेला. मोरे यांना रुग्णालयान न नेता तो रंकाळया जवळील जावळाच्या गणपतीच्या येथील एका बंद दुकानाजवळ घेवून आला. आपल्या सहकार्याच्या मदतीने त्यांना मोरे यांना रिक्षातून खाली उचलून रस्त्यावर ठेवले. त्यांच्या खिशातील ओळखपत्र व काही रक्कम त्याने काढून घेतली.

हा प्रसंग पाहणाऱ्या लोकांनी त्या तरुणाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले हे मामा रस्त्यात चक्कर येऊन पडले होते. त्यांचे ओळखपत्र मिळाले आहे. त्यांना याठिकाणी बसवून मी त्यांच्या घरातील लोकांना बोलवून आणतो, असे सांगून तो आपल्या सहकाऱ्यांच्या दूचाकीवरुन निघून गेला.

मोरे रस्त्यावरच बेशुध्दावस्थेत दुपारी १ पासून ४ वाजेपर्यंत पडून होते. येथील काही लोकांनी त्यांना शासकीय रुग्णवाहीकेतून (१०८) सीपीआर रुग्णालयात दाखल केले. सुमारे चार तास जखमी व बेशुध्दावस्थेत पडून राहिल्याने तसेच वेळेत उपचार न झालेने ते कोम्यात गेले. गेली सहा दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. अखेर शेवटी १६ जुलैला त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

रंकाळ्याजवळील एका दूकानाच्या समोर मोरे यांना सोडून जाणारा तरुण, त्यांच्या खिशातील पैसे घेवून जाताना सर्व प्रसंग येथील एका दूकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. मोरे यांच्या मुलगा प्रताप मोरे यांनी हे चित्रिकरण मिळवले असता त्यांना धक्काच बसला. संशयित २६ वर्षाचा तरुण निळा शर्ट, जिन्सची पॅन्ट घालून आहे. त्याच्या हलगर्जीपणामुळे वडीलांचा हकनाक बळी गेला. त्यांनी याबाबत संबधीत तरुणाच्या विरोधात जुनाराजवाडा पोलीसांत फिर्याद दिली.

पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या दूचाकीचा नंबर अस्पष्ट आहे. त्यामुळे अद्यापही तो मिळून आलेला नाही. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचे वृत्त वॉटसअ‍ॅप, फेसबुकवरुन प्रसारीत झालेने खळबळ उडाली आहे. नागरिकांतून संशयित तरुणाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. नराधम तरुण कोणाला दिसून आलेस, त्याला कोणी ओळखत असलेस जुनाराजवाडा पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांनी केले आहे.

या अपघाताप्रकरणी पोलीसांत संशयित तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. आम्ही त्याचा कसून शोध घेत आहोत. लवकरच त्याला अटक करु.मानसिंह खोचे : पोलीस निरीक्षक, जुनाराजवाडा पोलीस ठाणे.शंकरराव मोरे (मृत)

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर