कोल्हापूर : दंगल व मारामारी घडविण्याचा प्रकाश आवाडे यांचा कट : सुरेश हाळवणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 04:35 PM2019-01-03T16:35:14+5:302019-01-03T16:36:55+5:30

इचलकरंजीत कॉंग्रेस पक्षाने सभेला मला निमंत्रण न देताच परस्पर आव्हान देऊन दोन्ही गट समोरासमोर आणण्याचा तसेच त्यातून दंगल व मारामारी घडविण्याचा प्रकाश आवाडे यांचा कट होता. असा आरोप आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी दुपारी कोल्हापूरात शासकिय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत केला. काँग्रेसच्या सभेला मला बोलवणं म्हणजे, ‘त्यांचे’ बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण असल्याचीही टिका त्यांच्यावर यावेळी केली.

Kolhapur: Cutting of Light Haila to Streggle and Fighting: Suresh Halwankar | कोल्हापूर : दंगल व मारामारी घडविण्याचा प्रकाश आवाडे यांचा कट : सुरेश हाळवणकर

कोल्हापूर : दंगल व मारामारी घडविण्याचा प्रकाश आवाडे यांचा कट : सुरेश हाळवणकर

googlenewsNext
ठळक मुद्देदंगल व मारामारी घडविण्याचा प्रकाश आवाडे यांचा कट : सुरेश हाळवणकर कोल्हापूरात शासकिय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत आरोप

कोल्हापूर : इचलकरंजीत कॉंग्रेस पक्षाने सभेला मला निमंत्रण न देताच परस्पर आव्हान देऊन दोन्ही गट समोरासमोर आणण्याचा तसेच त्यातून दंगल व मारामारी घडविण्याचा प्रकाश आवाडे यांचा कट होता. असा आरोप आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी दुपारी कोल्हापूरात शासकिय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत केला. काँग्रेसच्या सभेला मला बोलवणं म्हणजे, ‘त्यांचे’ बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण असल्याचीही टिका त्यांच्यावर यावेळी केली.

आमदार हळवणकर म्हणाले, इचलकरंजीमध्ये प्रकाश आवाडे यांच्या काँग्रेसच्या पार्टीने मला आव्हान देण्यासाठी सभा आयोजीत केली होती. पण या सभेचे मला कोणतेही निमंत्रण दिले नव्हते. त्यात या सभेला मला बोलवणं म्हणजे ‘त्यांचे’ बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण म्हणावे लागेल.

मी केलेल्या कामाचा लेखाजोखा देण्याबाबत काँग्रेसच्यावतीने त्यांनी सभेचे आयोजन केले होते. पण सभेच्या माध्यमातून दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आणण्याचा तसेच त्यातून दंगल घडविण्याचा आवाडे यांचा डाव होता असा आरोप करत, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही, मी त्यांचा अगर काँग्रेसचा नोकर नाही, मला मतदारांनी निवडून दिले आहे.

मी दरवर्षी माझ्याकडून केलेल्या विकासकामांची पुस्तीका काढतो व ती मतदारापर्यत पोहचवतो, तशी आवाडे यांच्याही घरी पोहचते असेही ते म्हणाले. प्रकाश आवाडे यांनी माझ्या नावाचा गैरवापर करुन ज्या प्रमाणे सभेचे नियोजन केले तसे यापूढे खपवून घेतले जाणार नाही, तसे केल्यास काँग्रेस अध्यक्षांसह नेत्यावरही गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा हळवणकर यांनी दिला.

बालीशपणाचा प्रयत्न

मी केलेल्या विकासकामाबाबत त्यांनी सभा घेऊन तेथे वेगळेच षडयंत्र होते, हे निंदनीय असून असा पुन्हा बालीशपणाचा प्रयत्न आवाडे यांनी करु नये असेही त्यांनी सुनावले.

आवाडेंनी ६० वर्षातील हिशेब द्यावा

विकासकामाबाबत मला जाब विचारणारे हे प्रकाश आवाडे कोण? असा प्रश्न करत प्रथम त्यांनी गेल्या ६० वर्षातील कामांचा हिशेब द्यावा असेही आवाहन आमदार हळवणकर यांनी केले.

Web Title: Kolhapur: Cutting of Light Haila to Streggle and Fighting: Suresh Halwankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.