शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

 कोल्हापूर : लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 5:04 PM

‘लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’, ‘घोडेबाजार करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

ठळक मुद्देलोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असोकाँग्रेसतर्फे निदर्शने; दाभोळकर कॉर्नर येथे जोरदार घोषणाबाजी

 कोल्हापूर : ‘लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’, ‘घोडेबाजार करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.भाजपच्या सत्तापिपासू धोरणाचा निषेध करण्यासाठी दाभोळकर कॉर्नर येथे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत रस्त्यावर ठिय्या मारला.

‘नहीं, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी’, ‘मोदी सरकार... हाय हाय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजप सत्तेच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करीत आहे. त्याच्या निषेधार्थ आणि कोणत्या पद्धतीने भाजप सत्तेचा गैरवापर करीत आहे याचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यभर निदर्शने करण्यात येत आहेत.

शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण म्हणाले, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि जेडीएस पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केलेला असताना राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला निमंत्रण देणे अयोग्य आहे.

या निदर्शनांमध्ये प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. सुरेश कुराडे, महिला जिल्हाध्यक्ष अंजना रेडेकर, शहराध्यक्षा संध्या घोटणे, सरलाताई पाटील, दीपा पाटील, नगरसेविका सुरेखा शहा, माजी महापौर सुलोचना नायकवडी, नगरसेवक अर्जुन माने, तौफिक मुल्लाणी, दिलीप पोवार, प्रवीण केसरकर, प्रताप जाधव, संजय मोहिते, विक्रम जरग, सचिन चव्हाण, एस. के. माळी, संपतराव चव्हाण-पाटील, किशोर खानविलकर, अश्पाक आजरेकर, शिवानंद बनछोडे, सर्जेराव शिंदे, भगवान जाधव, शिवाजी कांबळे, हिंदुराव चौगुले, बाजीराव सातपुते, उमेश पोर्लेकर, रणजित पोवार, आदी सहभागी झाले.

निषेधाचे फलकबहुमतासाठी नाहीत आमदार ११२, भाजपने लोकशाहीचे वाजविले ३-१३, लोकशाही वाचवा, देश वाचवा; गोवा, मणिपूर,मेघालयात संधी बहुमत असलेल्या आघाडीला; मग कर्नाटकातच का राहावे काँग्रेस-जेडीएसने पिछाडीला?’ असे निषेधाचे विविध फलक घेऊन कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेस