कोल्हापूर : भाजपच्या राज्यात गुन्हेगारांना राजाश्रय, राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 17:16 IST2018-04-11T17:16:39+5:302018-04-11T17:16:39+5:30
भाजपच्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून गुन्हेगारांना राजाश्रय दिला जात असल्याची खरमरीत टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

कोल्हापूर : भाजपच्या राज्यात गुन्हेगारांना राजाश्रय, राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
कोल्हापूर : भाजपच्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून गुन्हेगारांना राजाश्रय दिला जात असल्याची खरमरीत टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
बुधवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सध्यस्थितीवर कोरडे ओढले. ते म्हणाले, अहमदनगरचा प्रकार हा पूर्ववैमनस्यातून असला तरी निषेर्धाह आहे. त्याचे समर्थक कुणी करणार नाही. मात्र त्यामध्ये राजकीय सुडबुध्दीने कारवाई होता कामा नये.
आम्ही सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली म्हणूनच राज्यात सरकारविरोधी वातावरण तयार झाले आहे. या बदललेल्या वातावरणामुळेच सुरूवातीला एकला चलोची भाषा बोलणारे भाजपचे नेते आता शिवसेनेला युतीचे आवाहन करत आहेत.