कोल्हापूर : महाविद्यालयीन तरुणांना मारहाण, सायबर चौकातील घटना : तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:43 IST2018-12-08T15:42:59+5:302018-12-08T15:43:57+5:30
सायबर चौकातील मेसमध्ये जेवणासाठी जात असताना दूचाकीवरुन आलेल्या तिघा तरुणांनी चौघा महाविद्यालयीन तरुणांना बेदम मारहाण केली.

कोल्हापूर : महाविद्यालयीन तरुणांना मारहाण, सायबर चौकातील घटना : तिघांवर गुन्हा
ठळक मुद्दे महाविद्यालयीन तरुणांना मारहाणसायबर चौकातील घटना : तिघांवर गुन्हा
कोल्हापूर : सायबर चौकातील मेसमध्ये जेवणासाठी जात असताना दूचाकीवरुन आलेल्या तिघा तरुणांनी चौघा महाविद्यालयीन तरुणांना बेदम मारहाण केली.
शिवरत्न धर्मराज तोडकर (वय १९), हर्षल जाधव, सुरज शिंदे, ऋत्विक चव्हाण, हर्षद जाधव (सर्व रा. पाच बिवानकर नगर, सोलापूर, सध्या रा. विद्यार्थी वसतीगृह, शिवाजी विद्यापीठ) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना ६ डिसेंबरला घडली.
याप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी संशयित अमृत शंकर रणदिवे (२१), शुभम गब्बर कांबळे (२०), अनिकेत आढावा (सर्व रा. टेंबलाईवाडी नाका) यांचेवर गुन्हा दाखल केला.