कोल्हापूर : राधानगरीचा क्रमांक ३ चा दरवाजा बंद : दुधगंगेचाही विसर्ग झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 18:51 IST2018-07-26T18:49:57+5:302018-07-26T18:51:32+5:30
पावसाचा जोर कमी झाला असून गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात उघडझाप राहीली. दुपारी दीड वाजता दुधगंगेतून साडे तीन हजार क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आला तर राधानगरी धरणाचा क्रमांक ३ चा दरवाजाही साडे चार वाजता बंद झाला. अद्याप नद्या तुडूंब भरल्याने २० बंधारे पाण्याखाली आहेत.

कोल्हापूर : राधानगरीचा क्रमांक ३ चा दरवाजा बंद : दुधगंगेचाही विसर्ग झाला कमी
कोल्हापूर : पावसाचा जोर कमी झाला असून गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात उघडझाप राहीली. दुपारी दीड वाजता दुधगंगेतून साडे तीन हजार क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आला तर राधानगरी धरणाचा क्रमांक ३ चा दरवाजाही साडे चार वाजता बंद झाला. अद्याप नद्या तुडूंब भरल्याने २० बंधारे पाण्याखाली आहेत.
गेल्या आठवड्यात धुंवाधार पावसाने जिल्ह्यात महापूर आणला होता. परंतु गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून गुरुवारी पावसाची उघडीप होती. परंतु ढगाळ वातावरणाने वातावरणामध्ये कमालीचा गारठा जाणवत होता.
धरणक्षेत्रातील पाऊस थांबल्याने राधानगरी धरणाचा क्रमांक ३ चा दरवाजा बंद झाला. येथून ४,५०० क्युसेकने होणार विर्सग कमी होऊन तो आता १६००क्युसेकने सुुुरु आहे. त्याचबरोबर दुधगंगा धरणातून पाण्याचा विसर्ग दुपारी ३,५०० क्युसेकने कमी करण्यात आला असून येथून ४,५०० क्युसेक विसर्ग सुरु आहे.
पाण्याची पातळी कमी होत असून पंचगंगेची राजाराम बंधारा येथे पाणी पातळी सायंकाळी २५ .१० इंच राहीली. धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. अद्याप २० बंधारे पाण्याखाली असून १० ग्रामीण, ३ राज्य, ५ प्रमुख जिल्हा, १७ इतर जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असून पर्यायी मार्गाने वाहतुक सुरु आहे.
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात गुरुवारी सकाळी आठपर्यंत ९.०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये हातकणंगलेत २.०० मि.मी., शिरोळमध्ये १.००, पन्हाळ्यात ८.२९ , शाहूवाडी १५.६६, राधानगरी १२.३३, गगनबावडा १८.००, करवीर ७.७२, कागल ७.१४, गडहिंग्लज ३.१४, भुदरगड ८.८०, आजरा १५.००, चंदगड ९.५० मि.मी. पाऊस पडला आहे.