शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :नाताळ निमित्त बाजारपेठेत गर्दी, सोमवारी ख्रिसमस फेस्टिव्हलचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 18:27 IST

नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील लक्ष्मीपुरी, पापाची तिकटी , बाजारगेट आदी बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी ख्रिश्चन बांधवांची लगबग सुरु होती. न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चच्या आवारात सुरु असलेल्या ख्रिसमस फेस्टिव्हलचा समारोप शुक्रवारी झाला. दरम्यान, शहरातील कसबा बावडा, विक्रमनगर, ब्रम्हपुरी,लाईन बझार आदी परिसरातील चर्चमध्येही नाताळ निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देन्यू शाहूपुरी येथील ख्रिसमस फेस्टिव्हलचा समारोप कसबा बावडा, विक्रमनगर, ब्रम्हपुरी,लाईन बझार परिसरातील चर्चमध्ये विविध कार्यक्रमवाईल्डर चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई

कोल्हापूर : नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील लक्ष्मीपुरी, पापाची तिकटी , बाजारगेट आदी बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी ख्रिश्चन बांधवांची लगबग सुरु होती. न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चच्या आवारात सुरु असलेल्या ख्रिसमस फेस्टिव्हलचा समारोप शुक्रवारी झाला.दरम्यान, शहरातील कसबा बावडा, विक्रमनगर, ब्रम्हपुरी,लाईन बझार आदी परिसरातील चर्चमध्येही नाताळ निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवारी (दि.२५) नाताळ हा सण आहे. यानिमित्त सांताक्लॉज पोशाख व मेणबत्ती, टोप्या आदी साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. या सणानिमित्त वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये २० दिवसापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त वाईल्डर चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

गुरुवार (दि. २१) पासून सुरु झालेल्या ख्रिस्मस फेस्टिव्हलचा शुक्रवारी समारोप झाला. फेस्टिव्हलमध्ये फुड स्टॉल्स लावण्यात आले होते. तसेच फनी गेम्स, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, क रल साँग्स व ड्रॉर्इंग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. याचा बक्षिस वितरण समारंभ शाहूपुरी पोलिस ठाणयाचे निरीक्षक संजय मोरे यांच्या हस्ते सायंकाळी झाला.

नाताळ सण दिवशी सोमवारी सकाळी वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये आठ वाजता इंग्रजी उपासना , पावणे दहा वाजता पहिली मराठी उपासना, ११ वाजून १५ मिनिटांनी दुसरी आणि दुपारी १२.३० वाजता तिसरी मराठी उपासना होणार आहे.

यावेळी वाईल्डर मेमोरियल चर्चचे मॉडरेटर रेव्ह. जे. ए. हिरवे व अनिल जाधव मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी सहा वाजता ख्रिस्त जन्मदिन मराठी उपासना शहर उपासना मंदिरात होणार आहे. यावेळी रेव्ह. डी. बी. समुद्रे मार्गदर्शन करणार असल्याचे पत्रक वायल्डर मेमोरियल चर्चने प्रसिद्धीस दिले आहे.

 

टॅग्स :Chrismasख्रिसमसkolhapurकोल्हापूर