‘सेंट अ‍ॅन्स कथिड्रल’ भाविकांसाठी खुलेमंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:27 AM2017-12-17T01:27:54+5:302017-12-17T01:28:33+5:30

नाशिकरोड परिसरात असलेल्या संत अण्णा चर्चचे रूपांतर कथिड्रलमध्ये करण्यात आले असून, नव्याने साकारलेल्या या ‘सेंट अ‍ॅन्स कथिड्रल’ चर्चचे मंगळवारी (दि. १९) उद्घाटन होणार आहे.

Organizing different programs for 'St Anas Cathedral', Khomeangalvari for the devotees | ‘सेंट अ‍ॅन्स कथिड्रल’ भाविकांसाठी खुलेमंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

‘सेंट अ‍ॅन्स कथिड्रल’ भाविकांसाठी खुलेमंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next
ठळक मुद्देडॅनिअल आणि कार्डिनल यांची विशेष उपस्थितीदोन हजार भाविक बसू शकतील

नाशिक : नाशिकरोड परिसरात असलेल्या संत अण्णा चर्चचे रूपांतर कथिड्रलमध्ये करण्यात आले असून, नव्याने साकारलेल्या या ‘सेंट अ‍ॅन्स कथिड्रल’ चर्चचे मंगळवारी (दि. १९) उद्घाटन होणार आहे.
या चर्चच्या उद्घाटनासाठी बिशप लुडर््स डॅनिअल आणि कार्डिनल ओजवल्ड ग्रेशस यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता या चर्चचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यावेळी कार्डिनल आॅसवल्ड ग्रेशिअस यांच्या हस्ते महामंदिर अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. प्रत्येक धर्मप्रांताचे एक मुख्यालय आणि त्याला जोडून असलेल्या मुख्य चर्चला कॅथिड्रल (महामंदिर) म्हणतात. नव्याने सुरू होणारे हे चर्च अत्यंत भव्य असून, या चर्चमध्ये एकावेळेस दोन हजार भाविक बसू शकतील अशी व्यवस्था आहे. मध्ययुगीन युरोपातील गॉथिक शैलीचे स्थापत्यशास्त्र वापरून या कथड्रिलचे बांधकाम करण्यात आले असून, यात पास्टरल सेंटर, कॅटेकॅटिकल सेंटर आणि धर्मगुरू निवासस्थानाची सोय करण्यात आली आहे. तसेच कथड्रिलच्या वरच्या मजल्यावर सभागृहाचीदेखील निर्मिती करण्यात आली आहे. मंगळवारी होणाºया कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन फ्रान्सिस वाघमारे आणि फादर रॉबर्ट पेन यांनी केले आहे.

Web Title: Organizing different programs for 'St Anas Cathedral', Khomeangalvari for the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.