चर्चमध्ये नाताळ सणाची जय्यत तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:50 AM2017-12-22T00:50:16+5:302017-12-22T00:52:55+5:30

नाशिक : नाताळ सण अर्थात येशू खिस्ताचा जन्मोत्सव ख्रिस्ती बांधवामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात येतो. या सणासाठी शहरातील सर्व चर्चमध्ये तसेच ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या नाताळ सणासाठी चर्चच्या आवारात येशू जन्माच्या देखावा उभारण्याचे काम सुरू आहे.

The church is preparing for the Christmas season preparations | चर्चमध्ये नाताळ सणाची जय्यत तयारी सुरू

चर्चमध्ये नाताळ सणाची जय्यत तयारी सुरू

Next
ठळक मुद्देयेशू जन्माच्या देखावा उभारण्याचे काम सुरू संत आंद्रिया चर्चमध्ये नाताळ सणानिमित्त आकर्षक सजावट

नाशिक : नाताळ सण अर्थात येशू खिस्ताचा जन्मोत्सव ख्रिस्ती बांधवामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात येतो. या सणासाठी शहरातील सर्व चर्चमध्ये तसेच ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या नाताळ सणासाठी चर्चच्या आवारात येशू जन्माच्या देखावा उभारण्याचे काम सुरू आहे. शरणपूररोडवरील संत आंद्रिया चर्चमध्ये नाताळ सणानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली असून परिसरात विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे. तसेच चर्चच्या आवारातच दरवर्षीप्रमाणेच यंदाही गव्हाणीचा म्हणजे येशू ख्रिस्त जन्माचा देखावा साकारण्यात येत आहे. त्र्यंबकरोडवरील होली क्रॉस चर्चमध्येदेखील नाताळ सणाची जय्यत तयारी सुरू आहे. चर्चमध्ये ख्रिसमस ट्री, जिंगलबेल, चांदण्या आदी लावून आकर्षक सजावट करण्यात येत आहे. डिसूझा कॉलनी परिसरातील डॉन बॉस्को चर्चमध्येदेखील नाताळनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: The church is preparing for the Christmas season preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.