शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बालसाहित्यिक श्याम कुरळे सरांचे काय झाले?, वर्ष झाले बेपत्ताच; शोध घेण्यात पोलिसांना अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:09 IST

सीसीटीव्हीमध्ये दिसले, परंतु..

कोल्हापूर : ज्येष्ठ लेखक, बालसाहित्यिक श्याम कुरळे हे घरातून निघून जाऊन सोमवारी (दि. २१) तब्बल एक वर्ष झाले. परंतु अजूनही ते सापडले नसून त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे. तब्येत बरी नसल्याने त्यांचा पत्ताही नीट सांगू शकत नव्हते. सर अजूनही कोठून तरी घरी येतील किंवा अमुक ठिकाणी ते आहेत, असा काहीतरी निरोप येईल म्हणून कुटुंबीय प्रतीक्षा करत आहेत.मूळचे राधानगरी तालुक्यातील सोळांकुरचे असलेले कुरळे हे भोगावती हायस्कूलला मुख्याध्यापक होते. अनेक वर्षे ग्रामीण साहित्यामध्ये योगदान देणाऱ्या कुरळे यांनी बालसाहित्यामध्येही भरीव कामगिरी केली होती. साने गुरुजी वसाहतीमध्ये आपटेनगर पाण्याच्या टाकीजवळ ‘अक्षर’ बंगल्यामध्ये ते राहात होते. साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. विविध साहित्य संमेलने आणि साहित्यविषयक उपक्रमांना आवर्जून हजेरी लावण्याची त्यांना आवड होती. या पार्श्वभूमीवर वयाच्या ८१व्या वर्षाआधीपासून त्यांना स्मृतिभंशाचा त्रास होत होता. अशातच २१ एप्रिल २०२४ रोजी रात्री पाऊण वाजता ते घरातून बाहेर पडले. ते परत घरी आलेच नाहीत.दिवसभर शोधाशोध करून रात्री जुना राजवाडा पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची वर्दी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मुलांनी, नातेवाइकांनी आठवडाभर सर्वत्र त्यांचा शोध घेतला. विद्यार्थीप्रिय असलेल्या कुरळे सरांच्या शोधासाठी विद्यार्थ्यांनीही पुढाकार घेतला. कोल्हापूरच्या सर्व प्रमुख चौकात त्यांच्या छायाचित्रासह फलक लावण्यात आले. परंतु त्यामध्ये यश आले नाही. ते जवळच्या मेडिकल स्टोअर्समध्ये गेले. खालूनच व्हिक्सच्या गोळ्या मागितल्या आणि त्या घेऊन ते गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. परंतु त्यापुढे मोठा फलक लावल्यामुळे ते पुढे नेमके कोठे गेले याचा पत्ता लागला नाही. वर्ष झाले तरी त्यांचा शोध घेण्यात जुना राजवाडा पोलिसांनाही अपयश आले आहे.

घरचे अजूनही प्रतीक्षेतकुरळे सरांच्या घरी अजूनही त्यांच्या पत्नी, मुले, सुना त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. इतके तंत्रज्ञान पुढे गेलेले असले तरी घरातून निघून गेलेल्या माणसाला शोधण्यासाठी ते उपयुक्त ठरले नसल्याची खंत या सर्वांना आहे. सर्वांचे भले चिंतणाऱ्या हा माणूस कुठे असेल या चिंतेत वर्षभर कुटुंबीय आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस