कोल्हापूर : चाकु ह्ल्ल्यात कनाननगरातील तरुण जखमी ; संशयिताचा शोध सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 14:07 IST2019-01-03T14:06:29+5:302019-01-03T14:07:51+5:30
पुर्ववैमन्यस्यातून कनाननगर येथील तरुणावर चाकु हल्ला करुन जखमी केल्याची घटना विश्वशांती चौकाजवळ बुधवारी (दि. २) घडली. पंकज उर्फ धीरज पांडूरंग सुतार (वय १९ रा. ई. पी. स्कुल, कनाननगरजवळ) असे या जखमीचे नांव आहे. याप्रकरणी संशयित गणेश सर्जेराव सावंत (रा. कनाननगर, कोल्हापूर) याच्यावर शाहूपुरी पोलिसात रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

कोल्हापूर : चाकु ह्ल्ल्यात कनाननगरातील तरुण जखमी ; संशयिताचा शोध सुरु
कोल्हापूर : पुर्ववैमन्यस्यातून कनाननगर येथील तरुणावर चाकु हल्ला करुन जखमी केल्याची घटना विश्वशांती चौकाजवळ बुधवारी (दि. २) घडली. पंकज उर्फ धीरज पांडूरंग सुतार (वय १९ रा. ई. पी. स्कुल, कनाननगरजवळ) असे या जखमीचे नांव आहे. याप्रकरणी संशयित गणेश सर्जेराव सावंत (रा. कनाननगर, कोल्हापूर) याच्यावर शाहूपुरी पोलिसात रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पुर्वीच्या वादाचे कारणावरुन पंकज सुतार व गणेश सावंत यांच्यात कनाननगरात वाद झाला. या वादातून बुधवारी दूपारी विश्वशांती चौकाजवळ गणेशने पंकजच्या हातावर चाकू मारला. यात तो जखमी झाला. घटनेनंतर गणेश पसार झाला.
हा प्रकार समजताच जखमी अवस्थेत त्याला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) उपचारासाठी नेण्यात आले. तो मोलमजुरीचे काम करतो. याबाबत पंकज सुतारने फिर्याद दिली आहे. संशयितावर यापुर्वी लक्ष्मीपुरी,चंदगड पोलिसात गुन्हे दाखल आहेत.त्याचा शोध सुरु आहे. याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत पोरे करीत आहेत.