शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

कोल्हापूर :शहरासह उपनगरात चेन स्नॅचरचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 13:12 IST

‘धूम स्टाईल’ने हिसडा मारून महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चेन स्नॅचरनी शहरासह उपनगरात धुमाकूळ घातला आहे. रविवारी (दि. ३) सायंकाळी सहा ते सात या वेळेत आरकेनगर, इंगळेनगर, फुलेवाडी रिंगरोड या तिन्ही ठिकाणी महिलांच्या गळ्यातील गंठण हिसडा मारुन लंपास केले. चोरट्यांनी पोलीसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरासह उपनगरात चेन स्नॅचरचा धुमाकूळतासाभरात तीन ठिकाणी चेन स्नॅचिंग : पोलीसांना आव्हान

कोल्हापूर : ‘धूम स्टाईल’ने हिसडा मारून महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चेन स्नॅचरनी शहरासह उपनगरात धुमाकूळ घातला आहे. रविवारी (दि. ३) सायंकाळी सहा ते सात या वेळेत आरकेनगर, इंगळेनगर, फुलेवाडी रिंगरोड या तिन्ही ठिकाणी महिलांच्या गळ्यातील गंठण हिसडा मारुन लंपास केले. चोरट्यांनी पोलीसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.रस्ता निर्जन असो अथवा वर्दळीचा, महिला एकटी असो वा दुकटी; जर महिलेच्या अंगावर दागिने असतील, तर ती महिला घरी दागिन्यांसह सुखरूप पोहोचेल, याची आता शाश्वती नाही. कारण हिसडा मारून ‘धूम स्टाईल’ने दागिने लंपास करणाऱ्यांपुढे पोलिसांनीही हात टेकले आहेत.

आर. के. नगर येथील हेमलता संयज टेंबुर्ले यांचे बंगल्यासमोर अलका शिवानंद उत्तूरे या महिलेचे एक तोळ्याचे सोन्याचे गंठण, श्री कृष्ण रेसीडेन्सी इंगळे नगर येथील सुुलक्षणा सुभाष सुखी यांचे तीन तोळ्यांचे गंठण, फुलेवाडी रिंगरोडवर अयोध्या कॉलनी येथे के.एम.टी. बसमध्ये चढताना शीला गजानन निकम यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरट्याने हिसडा मारून लंपास केले. अवघ्या तासाभरात तीन ठिकाणी चेन स्नॅचिंग झालेने पोलीस चक्रावून गेले.सदरबजारापर्यंत मागफुलेवाडी, इंगळेनगर आणि आर. के. नगर येथील चेन स्नॅचरांचा पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेतला असता ते सदरबजारपर्यंत गेलेचे दिसून आले. चोरट्यांचे चेहरे निष्पन्न झाले असून त्यांना लवकरचं अटक केली जाईल, असे करवीरचे पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी सांगितले.असे होते चेन स्नॅचिंगतोंडाला माकडटोप्या घालून किंवा रूमाल, हेल्मेट बांधून चोरटे काळ्या रंगाच्या पल्सर किंवा स्प्लेंडर गाडीवरून शहरात कुठे संधी मिळते, याची चाचपणी करत असतात. एकटी महिला दिसताच तिच्या जवळून जाऊन अंगावरील दागिन्यांचे निरीक्षण करून ते पुढे निघून जातात. त्यानंतर पुन्हा तीन ते चारवेळा तिच्याजवळून फेऱ्या मारतात.

महिला विचारात किंवा बोलण्यात गुंग असताना आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून, पाळत ठेवून दुचाकीवरून भरधाव येऊन तिच्या गळ्यातील मौल्यवान दागिना हिसकावून ‘धूम स्टाईल’ने ते पलायन करतात. त्यासाठी ते विनानंबरप्लेट दुचाकी तसेच चोरीच्या गाडीचा वापर करतात.कायद्याची अंमलबजावणी व्हावीमहिलांच्या कानातील सोन्याची कर्णफुले किंवा गंठण हिसडा मारून काढून घेताना त्यांचे कानही फाटले आहेत तर काहींना जीवदेखील गमवावा लागला आहे. चोरट्यांच्या शिकार झालेल्या बहुतांश महिला या मानसिक धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. त्यामुळे अशा गुन्हयातील चेन स्नॅचरना जरब बसविण्यासाठी किमान दोन ते पाच वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा