शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
2
हो… अगदी खरे आहे… ‘वंदे भारत’हून वेगवान, शताब्दीपेक्षा सुपरसेवा; तिकीट फक्त ₹५! कोणती ट्रेन?
3
10 मिनिटांच्या डिलिव्हरीला ब्रेक; झेप्टो, ब्लिंकइट, स्विगीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; उद्या निकाल लागण्याची शक्यता; निर्णय विरोधात गेल्यास काय करणार?
5
Municipal Election: भाजपाची मतदानाआधी मोठी कारवाई! माजी महापौरांसह ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी
6
लॅपटॉपचा कीबोर्ड अचानक बंद झालाय? सर्व्हिस सेंटरला धावण्यापूर्वी करा 'हे' ५ सोपे उपाय; वाचतील हजारो रुपये!
7
भरधाव ट्रेनमधून १४० मीटरपर्यंत उडाल्या ठिणग्या, भीतीचं वातावरण, मोठा अपघात टळला
8
सीमेपलीकडे 8 दहशतवादी छावण्या सक्रिय; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची मोठी माहिती
9
Ambernath: अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
10
भारीच! गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने खरेदी केलेला 'लव्ह इन्शुरन्स'; १० वर्षांनी केलं लग्न अन् झाले मालामाल
11
भयंकर फसवणूक! दोन मुलांच्या बापाने गुपचूप बदललं लिंग; २ वर्षांनंतर पत्नीला कळलं, कोर्टात म्हणाली..."
12
Winter Recipe: हाय-प्रोटिन 'बाजरी मुंगलेट': थंडीत वजन कमी करण्यासाठी आणि नाश्त्यासाठी सर्वोत्तम पौष्टिक रेसिपी!
13
तुमचे 'मनी मॅनेजमेंट' किती स्ट्रॉन्ग आहे? सरकारी क्विझ खेळा आणि रोख १०,००० रुपये मिळवा
14
“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका
15
चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं?
16
Virat Kohli च्या RCB साठी आली महत्त्वाची बातमी ! IPL 2026 आधी मोठा बदल, चाहते होणार नाराज?
17
“बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया”; मनसेच्या निष्ठावंताची पत्रातून मतदारांना भावनिक साद
18
धक्कादायक! प्रेयसीने 'बाय-बाय डिकू' म्हटलं अन् तरुणाने आयुष्य संपवलं; कपाटात लपलेलं होतं मृत्यूचं रहस्य
19
फक्त 5.59 लाख रुपयांत TATA PUNCH Facelift २०२६ लॉन्च; आजपासून बुकिंग सुरू, जबरदस्त आहे लूक
20
Gold-Silver च्या दरानं तोडले सर्व विक्रम; १३ दिवसांत ₹३२,३२७ नं वाढली चांदी, सोन्याच्या दरात ₹७२८७ ची तेजी
Daily Top 2Weekly Top 5

एकमत करा, कोल्हापूरच्या हद्दवाढ प्रस्तावावर १५ व्या मिनिटाला सही; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:50 IST

‘मिसळ कट्ट्या’वर मांडले कोल्हापूरचे व्हिजन

कोल्हापूर : कोणत्याही शहराच्या विकासासाठी हद्दवाढीशिवाय पर्याय नाही. कोल्हापूरचे नेते हळूहळू एकमताने हद्दवाढीकडे चालले आहेत. नेत्यांचे आणि जनतेचे एकमत जेव्हा होईल त्यावेळी १५ व्या मिनिटाला मी त्या प्रस्तावावर सही करेन, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.भाजपच्यावतीने आयोजित ‘मिसळ कट्टा’ उपक्रमामध्ये त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूरबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देताना टोलमाफीपासून ते दिलेल्या निधीपर्यंतची आठवण करून दिली. अभिनेते स्वप्नील राजशेखर, चारूदत्त जोशी आणि कृष्णराज महाडिक यांनी ही प्रकट मुलाखत घेतली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हद्दवाढीचा विषय २०१४ साली जेव्हा पुढे आला, तेव्हा आदरणीय हयात नसलेल्या मंडळींनी टोकाचा विरोध केला. मी घाबरून गेलो. म्हणून मग प्राधिकरण स्थापन केले. परंतु, हद्दवाढ हाच खरा उपाय आहे. महापालिका निवडणूक झाल्यानंतर हद्दवाढीला विरोध करणाऱ्यांच्या शिष्टमंडळाला अर्धा, पाऊण तास वेळ देऊन त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची माझी तयारी आहे. हद्दवाढीनंतर आधीच्या गावातील कोणत्याही करामध्ये पाच वर्षे वाढ करायची नाही हे राज्याचे धोरण आहे. 

वाचा : मूलभूत सुविधा नाहीत, हद्दवाढ करून फायदा काय, विनय कोरे यांचा सवालमहाराष्ट्रातील ५० टक्के जनता ही ४० हजार गावांत राहते आणि ५० टक्के जनता ४०० शहरांमध्ये राहते. त्यातील ९० टक्के जनता ही या २९ शहरांमध्ये राहते. त्यामुळे शहरांचे रस्ते, पाणी आणि अन्य मूलभूत प्रश्न सातत्याने चर्चेत येतात. देशातील ६५ टक्के जीडीपी हा शहरांमधून मिळत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा शहर सुधारणांसाठी जाणीवपूर्वक मोठ्या निधीची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.यावेळी फडणवीस यांनी लखपती दीदी, कोल्हापूर-बंगळुरू इंडस्ट्रियल काॅरिडॉरमुळे कोल्हापूरला येणारे महत्त्व, स्वामी विवेकानंद यांचा युवकांना संदेश, आपले मार्गदर्शक, सोशल मीडिया अशा विविध विषयांवर मते व्यक्त केली. महेश जाधव, विजय जाधव, आदिल फरास, सुजित चव्हाण यांनी फडणवीस यांचे स्वागत केले.कोल्हापूरकरांना टोल टोचत होताकोल्हापूरमध्ये चांगले रस्ते झाले. परंतु, आमच्याच शहरात टोल का? असे म्हणणाऱ्या कोल्हापूरकरांना टोल टोचत होता. तेव्हा चंद्रकांत पाटील पालकमंत्री होते. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आम्ही असा निर्णय घेतला आणि कोल्हापूरकरांना भरावे लागणारे तब्बल ७०० कोटी रुपये आपल्या सरकारने भरले, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

रिंग रोड आणि फ्लायओव्हरकोल्हापूर शहराची क्षमता आणि वाढ याच विचार करता याठिकाणी टनेलची गरज भासणार नाही. परंतु, रिंग रोडचे नियोजन आणि काही प्रस्तावित फ्लायओव्हरची उभारणी केली तर कोल्हापूरच्या वाहतुकीची समस्या कमी होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

पंचगंगा प्रदूषणमुक्त आणि कोल्हापूर पूरमुक्तपंचगंगा प्रदूषण आणि पूरमुक्तीविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, पंचगंगेमध्ये काठावरची शहरे, गावे आणि उद्याेग यांचे सांडपाणी जाते. त्यामुळेच टप्प्याटप्प्याने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले जात आहेत. महाराष्ट्रातील उद्योगांकडून मिळणाऱा पैसा हा महाराष्ट्रातीलच पर्यावरण सुधारणा आराखड्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाला पाठवला आहे. त्याची पूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी सात वर्षे लागतील. परंतु, तीन, चार वर्षांत पाण्याचा दर्जा चांगला होण्यास सुरूवात होईल. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पुराचे सुमारे ३५ टीएमसी पाणी तहानलेल्या मराठवाड्याला देण्याच्या प्राथमिक कामांनाही सुरूवात झाली आहे. त्यामुळे साडेतीन वर्षांत १०० टक्के कोल्हापूर पूरमुक्त होईल.

जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारूकोल्हापूरच्या क्रीडाविषयक परंपरेचा कौतुकाने उल्लेख करत फडणवीस यांनी यावेळी कोल्हापूरमध्ये जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्याचा शब्द दिला.

कोल्हापूरच्या विमानसेवेचा चौपट विस्तारविमानसेवेबाबत विचारता फडणवीस म्हणाले, आता विमानसेवा ही लक्झरी राहिलेली नाही. तर कोणत्याही उद्योगांसाठी आणि शहरांच्या विकासासाठी एअर कनेक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची ठरत आहे. आम्ही कोल्हापूरचा रन-वे वाढवण्यासाठी भूसंपादनासाठीचा निधी दिला आहे. एकदा का मोठी विमाने सुरू झाली की, मग कोल्हापूरच्या विमानसेवेचा चौपट विस्तार होईल.

आता महिलांना कोणीही रोखू शकणार नाहीआम्ही १५०० रुपये लाडक्या बहिणांना दिले. आता आम्ही त्यांना लखपती दीदी बनवणार आहोत. राज्यात आतापर्यंत ५० लाख दीदी लखपती झाल्या आहेत. मी यापुढे नूतन नगरसेवक आणि महापौरांना वाॅर्डामध्ये किती रस्ते केले, गटारे केली हे विचारणार नाही. तर तुम्ही किती लखपती दीदी केल्या हे विचारणार असल्याचे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

सर्व नेत्यांचे उपस्थितांना आवाहनयावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, महेश जाधव, प्रकाश आवाडे, ललित गांधी यांच्यासह मान्यवरांनी स्टेजवर येत विजयाची खूण दाखवत उपस्थितांना आवाहन केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur expansion: CM Fadnavis pledges swift approval upon consensus.

Web Summary : CM Fadnavis assured immediate approval for Kolhapur's expansion once leaders and citizens agree. He highlighted infrastructure development, pollution control for Panchganga river, and plans for improved air connectivity, promising comprehensive progress for the city.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस