कोल्हापूर : हिरवडे दूमाला येथे तरुणावर खूनी हल्ला, चौघांवर गुन्हा : तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 18:01 IST2018-04-13T18:01:28+5:302018-04-13T18:01:28+5:30
हिरवडे दुमाला (ता. करवीर) येथे ओरडू नका असे सांगितलेचा राग मनात धरुन चौघांनी तरुणावर खूनी हल्ला केला. लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने सौरभ हिंदुराव कदम (वय २४) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी करवीर पोलीसांनी तिघांना शुक्रवारी अटक केली. संशयित समाधान पाटील, अविनाश पाटील, सौरभ शेट्ये, प्रभु (पूर्ण नाव नाही) यांचेवर गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. १२) रात्री दहाच्या सुमारास घडली.

कोल्हापूर : हिरवडे दूमाला येथे तरुणावर खूनी हल्ला, चौघांवर गुन्हा : तिघांना अटक
कोल्हापूर : हिरवडे दुमाला (ता. करवीर) येथे ओरडू नका असे सांगितलेचा राग मनात धरुन चौघांनी तरुणावर खूनी हल्ला केला. लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने सौरभ हिंदुराव कदम (वय २४) हा गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी करवीर पोलीसांनी तिघांना शुक्रवारी अटक केली. संशयित समाधान पाटील, अविनाश पाटील, सौरभ शेट्ये, प्रभु (पूर्ण नाव नाही) यांचेवर गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. १२) रात्री दहाच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी, हिरवडे दूमाला येथे अक्षय हिंदुराव कदम व त्याचे मित्र गुरुवारी रात्री भावकीतील व्यक्ति मृत झालेने गावातील चौकात श्रध्दांजली फलक लावत होते. संशयित आरोपी हे भाड्याने घेतलेले एल. ई. डी. दिवे परत करण्यासाठी आले होते. परत करुन जात असताना मोठ्याने ओरडून हुक्क्या मारत होते.
यावेळी अक्षयचा भाऊ सौरभ कदम याने आमचे भावकीतील व्यक्ती मयत झाला आहे, तुम्ही ओरडू नका असे सांगितले. त्याचा राग मनात घरुन चौघांनी सौरभला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.
संशयित समाधान पाटील याने लोखंडी रॉड डोक्यात, कपाळावर, उजवे डोळ्याचे खाली जोराने मारल्याने सौरभ गंभीर जखमी झाला. त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले अधिक तपास करीत आहेत.