शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बालिका मृत्यू प्रकरण : किरवेच्या पोलीसपाटीलला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 11:45 IST

कोल्हापूर : दिवाळीनिमित्त रस्त्यावर आईसोबत आकाशकंदील, विद्युत माळा विक्रीसाठी बसलेल्या आठ वर्षांच्या बालिकेला बोलेरोखाली चिरडून पळून गेलेल्या किरवेच्या पोलीसपाटील ...

ठळक मुद्देबालिका मृत्यू प्रकरण : किरवेच्या पोलीसपाटीलला अटकताराबाई पार्कातील घटना, सीसीटीव्ही फुटेजवरून मिळविला बोलेरोचा नंबर

कोल्हापूर : दिवाळीनिमित्त रस्त्यावर आईसोबत आकाशकंदील, विद्युत माळा विक्रीसाठी बसलेल्या आठ वर्षांच्या बालिकेला बोलेरोखाली चिरडून पळून गेलेल्या किरवेच्या पोलीसपाटील याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित प्रशांत भाऊ पाटील (वय ३२, रा. किरवे, ता. गगनबावडा) असे त्याचे नाव आहे. बोलेरोखाली सापडून सुमैया ऊर्फ खदीजा बुराण सरकवास (रा. सदर बझार, कोल्हापूर) या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.सुमैया सरकवास ही आईसोबत मंगळवारी (दि. ६)ताराबाई पार्क येथील प्रादेशिक परिवहन विभागासमोर दिवाळीनिमित्त आकाशकंदील आणि विद्युत माळा विक्री करण्यासाठी बसली असताना भरधाव बोलेरोने सुमैयाला चिरडून साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी बोलेरोचा नंबर मिळविला. चौकशी केली असता, ती गगनबावडा तालुक्यातील किरवेचे पोलीसपाटील प्रशांत पाटील यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. तो त्याचा भाऊ व गावातील दोन व्यक्ती, असे चौघेजण दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापुरात आले होते.

घरी जात असताना त्याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटून ती बालिकेच्या अंगावर गेली. अपघातामध्ये बालिका मृत झाल्याचे समजताच प्रशांत पाटील हा कळे परिसरातील हॉटेलमध्ये लपून बसला. रात्री तो गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत होता. शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी त्याच्या हॉटेलवरच मुसक्या आवळल्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर