कोल्हापूर : मटका अड्यावर छापा, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 18:44 IST2018-08-01T18:43:13+5:302018-08-01T18:44:56+5:30
राजारामपुरी नऊ नंबर शाळेच्या पाठीमागे उघड्यावर मटका घेतना दोघांना पोलीसांनी बुधवारी अटक केली. संशयित आकाश प्रकाश सांगावकर (वय २३ रा. भाजी मार्केट परिसर शाहूनगर) व बाजीराव दत्तात्रय मुडेकर (वय ३९ रा.राजारामपुरी १२ वी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत.

कोल्हापूर : मटका अड्यावर छापा, दोघांना अटक
ठळक मुद्देमटका अड्यावर छापा, दोघांना अटकप्रशांत अमृतकर यांच्या पथकाने केली कारवाई
कोल्हापूर : राजारामपुरी नऊ नंबर शाळेच्या पाठीमागे उघड्यावर मटका घेतना दोघांना पोलीसांनी बुधवारी अटक केली. संशयित आकाश प्रकाश सांगावकर (वय २३ रा. भाजी मार्केट परिसर शाहूनगर) व बाजीराव दत्तात्रय मुडेकर (वय ३९ रा.राजारामपुरी १२ वी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत.
मटका मालक राहुल पाटील (रा. प्रतिभानगर) याच्यासाठी ते मटका घेत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पाटील याचेवरही गुन्हा दाखल केला आहे.
दोघांकडून मटक्याचे साहित्य व रोख रक्कम असा अडीच हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने केली.
आकाश सांगावकर (आरोपी)
बाजीराव मुडेकर (आरोपी)